Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल इतकंस जिरं, पण फायदे खूप

इतकंस जिरं, पण फायदे खूप

रोज १० दिवस जिरं खाल्ल्यास, शरीराला खूपच फायदे होतात. कितीही त्रास होत असल्यास, जिऱ्याच्या सेवनाने त्रास कमी होतात. जाणून घेऊया काय आहेत जिऱ्याचे फायदे.

Related Story

- Advertisement -

आपल्याकडे जिऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले पदार्थ जिऱ्याशिवाय पूर्ण होतंच नाहीत. फक्त मसाल्याचा स्वाद वाढवण्यासाठीच नाही तर जिरं हे शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. जिरं हे दिसायला अतिशय लहान असतं, पण त्याचे फायदे मात्र खूपच असतात. रोज १० दिवस जिरं खाल्ल्यास, शरीराला खूपच फायदे होतात. कितीही त्रास होत असल्यास, जिऱ्याच्या सेवनाने त्रास कमी होतात. जाणून घेऊया काय आहेत जिऱ्याचे फायदे.

व्यवस्थित पचन होतं – जिरं खाल्ल्यामुळं रोजच्या जेवणाचं व्यवस्थित पचन होतं. पोटात दुखत असल्यासदेखील जिरं खाल्ल्यामुळं पोटातील दुखणं कमी होण्यास मदत होते. गॅस आणि वाताचा त्रास असल्यासदेखील हा त्रास जिऱ्यामुळं कमी होतो.

- Advertisement -

त्वचा चांगली राखण्यास मदत – जिऱ्यामध्ये विटामिन ई चं प्रमाण अधिक असल्यामुळं त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत होते. शरीरात रक्त कमी असल्यामुळं चेहऱ्यावर येणारी मुरुमंसुद्धा जिरं खाल्ल्यामुळं नाहीशी होतात.

शरीरातील उष्णता कमी करतं – शरीरामध्ये उष्णता असल्यास, जिरं खाल्ल्यामुळं कमी होते. रोज नियमित जिरं खाल्ल्यामुळं शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत तर होतेच. याशिवाय पाण्यात जिरं मिसळून उकळून पाणी प्यायल्यास, उष्णता कमी होऊन आराम मिळतो.

- Advertisement -

उचकी थांबवण्यासाठी उपयोगी – जिऱ्याच्या पावडरमध्ये थोडंस व्हिनेगर टाकून मिक्स करून घ्यावं. ते चाटण खाल्ल्यास, उचकी थांबते. तर कच्चं जिरं खाल्ल्यास, अॅसिडीटीपासून लगेच सुटका होते.

मधुमेह नियंत्रणात आणता येतं – दिवसभरात दोन वेळा पाण्यात जिऱ्याची पावडर घालून प्यायल्यास, मधुमेह नियंत्रणात आणण्यात मदत होते. तर, जिरा पावडरमध्ये गूळ मिक्स करून त्याचे गोळे करून खाल्ल्यास, मलेरियापासूनदेखील आराम मिळतो.

- Advertisement -