वज्रासन हे एक साधे पण प्रभावी योगासन आहे, जे रोज फक्त 5 मिनिटे केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. विशेषतः पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि मानसिक स्थिरता मिळवण्यासाठी हे आसन केले जाते. जेवणानंतर लगेच करता येणारे हे एकमेव आसन आहे. हे आसन केल्यामुळे पोटाचे विकार देखील होत नाही. आज आपण जाणून घेऊयात रोज 5 मिनिटे वज्रासन करण्याचे कोणते फायदे आहेत.
रक्ताभिसरण सुधारते
हे आसन केल्याने आपल्या नितंब, पाय, घोट्या, गुडघे आणि मांड्या यांच्या स्नायूंची लवचिकता सुधारण्यास मदत होते.
मानसिक शांतता
वज्रासन हे ध्यानासाठी चांगले आसन आहे. श्वासोच्छवासाच्या व्यायामासह वज्रासन केल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो.
पचन सुधारते
जेवणानंतर वज्रासन केल्याने अन्न नीट पचते आणि अपचन, गॅस, आणि ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. पोटाच्या समस्या त्वरित दूर होतात.
मधुमेहासाठी फायदेशीर
वज्रासन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच इन्सुलिन उत्पादनात सुधारणा होते.
पाठदुखीसाठी
बऱ्याच लोकांना पाठदुखीची समस्या असते. परंतु वज्रासन केल्याने ही समस्या दूर होईल.
हृदयासाठी
वज्रासन हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वज्रासन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय रोगाचा धोका कमी होतो.
वज्रासन करण्याची योग्य पद्धत
- गुडघ्यावर बसून पायाचे तळवे मागच्या बाजूला ठेवावेत.
- पाठीला सरळ ठेवून दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा.
- डोळे बंद करून, श्वास सावकाश आत-बहेर घ्या.
- सुरुवातीला 5 मिनिटे करा आणि नंतर हळूहळू वेळ वाढवा.
वज्रासन करताना या गोष्टी लक्षात ठेवा
- वज्रासन करण्यास सुरूवात केल्यानंतर तुमचे पाय किंवा गुडघे दुखायला लागतील हे खूप सामान्य आहे.
- जर तुम्हाला गुडघ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल किंवा गुडघ्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली असेल तर हे आसन करू नका.
हेही वाचा : Health Tips : उत्तम आरोग्यासाठी मेथी
Edited By : Prachi Manjrekar