उन्हाळ्यात आपलं शरीर बऱ्याचवेळा डिहायड्रेट होत. अशावेळी आपल्याला शरीराला हायड्रेशनची खूप गरज असते. शरीराला योग्य प्रमाणात हायड्रेशन मिळण्यासाठी आपण अनेक ड्रिंक्स घेतो. परंतु जर तुम्हाला काही हेल्थी ट्राय करायचं असेल तर तुम्ही कैरीचे पन्हे निश्चितपणे घेऊ शकता. कैरीचे पन्हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे पिण्याचे अनेक फायदे देखील आहेत. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात उन्हाळयात कैरीचे पन्हे पिण्याचे फायदे.
सन स्ट्रोक
उन्हाळयात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉन्स निघून जातात. आपल्या शरीराला इलेक्ट्रॉन्स खूप गरज असते. उन्हाळ्यात घामातून ते इलेक्ट्रॉन्स निघून जातात. कैरीचे पन्हे हे इलेक्ट्रॉन्स संतुलन ठेवायला मदत करते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करते
उन्हाळयात उष्णता जास्त असल्यामुळे आपलं शरीर वारंवार डिहायड्रेट होत असतं अशावेळी तुम्ही कैरीचे पन्हे घेतल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि शरीर देखील हायड्रेट राहील.
कॅन्सरचा धोका टळतो
कैरीमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. कैरीच्या पन्ह्यामुळे आतड्याचा कॅन्सर आणि पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका टळतो .
बद्धकोष्ठापासून आराम
जर तुम्हाला वारंवार बद्धकोतेचा त्रास होत असेल तर या समस्येसाठी कैरीचे पन्हे उत्तम आहे.
हिरड्या निरोगी राहतात
कैरीच्या पन्ह्यामध्ये विटामिन सी असते. यातील पोटॅशियम आणि कॅल्शियम दात आणि हिरड्यांना निरोगी ठेवण्यास मदत करते.
अनेक आरोग्य समस्या दूर होतात
जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर कैरीचे पन्ह घेतल्याने या सर्व समस्या दूर होऊ शकतात. कैरीच्या पन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते जे अनेक आजार दूर करायला मदत करते.
टीबी, अॅनिमिया, कॉलरा यांसारख्या आजारांवरही हे टॉनिक म्हणून काम करते. यासोबतच घामाने शरीरातून बाहेर पडणाऱ्या सोडियम आणि झिंकची पातळीही राखते.
हेही वाचा : Korean Tea : रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोरियन चहा उत्तम
Edited By : Prachi Manjrekar