घरताज्या घडामोडीHealth Tips : हिवाळ्यात खजूर खाणे आरोग्यदायी ; जाणून घ्या फायदे

Health Tips : हिवाळ्यात खजूर खाणे आरोग्यदायी ; जाणून घ्या फायदे

Subscribe

थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण आपल्या खाण्या-पिण्यामध्ये बदल करतात. बाराही महिने बाजारात खजूर आढळतो. खजूर उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हा गुणकारी खजूर दररोज खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.ड्रायफ्रुट्स खाण्यासाठी उत्तम ऋतू म्हणजे थंडी. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. अशा स्थितीत खजूर अवश्य सेवन करा. खजूर खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. खजूराचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.

  •  खजूरमध्ये कॅल्शियम, लोह आणि इतर जीवनसत्त्वे खूप जास्त प्रमाणात आढळतात.खजूर खाल्ल्याने मज्जासंस्था खूप मजबूत होते. ते खाल्ल्याने मेंदूही निरोगी राहतो.
  • खजूर लोहाचा उत्तम स्रोत मानला जात असून, यामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. नियमितपणे खजूर खाल्ल्याने शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. खजुरामुळे थकवाही कमी होतो.
  • उच्च रक्तदाब असलेल्यांनी खजूर खावे. यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो. यासोबतच हृदयाशी संबंधित आजारही दूर राहतात. यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
  • हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने शरीर उबदार राहते. त्यामुळे हिवाळ्यात खजूर आपल्या आहाराचा भाग बनवा. खजूर दुधात घालूनही सेवन करू शकता. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
  • रोज खजूर खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट असे अनेक गुणधर्म खजूरमध्ये आढळतात. ते खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

हे ही वाचा – Omicron variant : ओमिक्रॉन व्हेरियंटला रोखण्यासाठी काय आहेत उपाय?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -