गणेशोत्सवाला देशभरात सुरुवात झाली आहे. अशातच बाप्पाला आवडणारे मोदक घरोघरी आवर्जुन तयार केले जातात. याचा नैवेद्य ही बाप्पाला दाखवला जातो. परंतु तुम्हाला माहितेयत का, मोदक खाल्ल्याने सुद्धा काही फायदे होतात.
-वजन कमी होते
मिठाई आवडणाऱ्या लोकांना मोदकांची चव आवडते. मात्र त्यांना यामुळे वजन वाढले जाईल अशी चिंता सुद्धा वाटत राहते. खरंतर मोदक खाल्ल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. मोदकात साखरेऐवजी गुळाचे सारण टाकल्यास तुमचे वजन कमी होऊ शकते. एक्सपर्ट्स असे मानतात की, ज्या लोकांना शुगर क्रेविंग होते त्यांनी गुळाचे मोदक खावेत.
-थायरॉइड
हेल्थ एक्सपर्ट्स असे मानतात की, मोदकाचे सेवन केल्याने थायरॉइडची समस्या कमी होऊ शकते. कारण यामध्ये एंटी एजिंग गुण असतात जे थायरॉइडच्या ग्रंथीला हेल्दी ठेवतात. ऐवढेच नव्हे तर गुळ असणाऱ्या मोदकांमुळे शुगरचा स्तर ही नियंत्रणात राहतो.
-बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
मोदकाला अन्य मिठाई प्रमाणेच तयार केले जाते. तर तुम्ही नारळाचे सारण असलेले मोदक खात असाल तर तुमची शुगर क्रेविंग दूर होईल. त्याचसोबत शरीरात फायबरचे प्रमाण वाढले जाईल. फायबर असे एक न्युट्रिएंट आहे जे पोटातील बद्धकोष्ठतेची समस्या होऊ देत नाही. हेल्थ एक्सपर्ट्स सुद्धा अशा गोष्टींचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
हेही वाचा- दररोज वरण-भात खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे