घरलाईफस्टाईलशेंगदाणे खाल्ल्यानं होतील ७ चमत्कार!

शेंगदाणे खाल्ल्यानं होतील ७ चमत्कार!

Subscribe

शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, जे शारीरिक वाढीसाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही रोज दूध अथवा अंड्याचं सेवन करत नसाल, तर रोज शेंगदाणे खाणं तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयोगी आहे.

शेंगदाणे म्हणजे गरिबांचा बदाम असं म्हटलं जातं. पोट भरलेलं असो वा रिकामं असो मित्रांसोबत कधीही शेंगदाणे खायला बसणं ही एक मजाच आहे. बदाममध्ये असणारी सर्व पौष्टीकता शेंगदाण्यात असते. कदाचित शेंगदाणे खाताना तुम्हाला त्याचा नक्की काय फायदा? याची कल्पना नसेल. बऱ्याच लोकांना बदाम घेणं परवडेलच असं नाही. पण शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, जे शारीरिक वाढीसाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही रोज दूध अथवा अंड्याचं सेवन करत नसाल, तर रोज शेंगदाणे खाणं तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयोगी आहे. आठवड्यात रोज जर १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ले तर काय सात चमत्कार होतात हे जाणून घेऊया.

१. बद्धकोष्ठता दूर करते – तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास, आठवडाभर रोज १०० ग्रॅम शेंगदाणे खावे. शेंगदाण्यातील सत्त्व पोटाशी निगडीत समस्यांपासून सुटका करतात. त्यामुळं बद्धकोष्ठतेचा त्रास निघून जातो.
२. शरीराची ताकद वाढते – ज्याप्रमाणे बदाम आणि अंडी खाल्ल्यानं शरीरातील शक्तीची वाढ होते, त्याप्रमाणेच शेंगदाणे खाल्ल्यानं तुमच्या शरीराला पुरेशी ताकद मिळते. त्याशिवाय पचनक्रियेसाठीदेखील उपयुक्त आहे. थंडीमध्ये शेंगदाणे खाणं चांगलं असतं.
३. गर्भवती महिलांसाठी फायदेशीर – गर्भात असणाऱ्या बाळाचा विकास शेंगदाणे खाल्ल्यानं चांगला होतो. त्याशिवाय गर्भार अवस्थेत ताकद मिळण्यासाठीदेखील उपयोग होतो.
४. त्वचेसाठी उपयुक्त – शेंगदाण्यात ओमेगा ६ असल्यामुळं त्वचा कोमल आणि नरम राहण्यास मदत होते. शेंगदाण्याचा उपयोग पेस्ट करून फेसपॅक म्हणून करता येतो. थंडीच्या दिवसात शेंगदाण्याच्या पेस्टचा उपयोग कोरड्या त्वचेसाठी होतो.
५. ह्रदयविकारापासून ठेवते दूर – ह्रदयविकाराच्या त्रासापासून शेंगदाणे दूर ठेवतात. शेंगदाण्याचं नियमित सेवन केल्यास, ह्रदयाशी निगडीत रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. शिवाय रक्तदेखील योग्य प्रमाणात शरीरामध्ये राहते.
६. सुरकुत्या दिसत नाहीत – वय वाढतं तसं चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. शेंगदाण्यात असलेल्या अॅन्टी – ऑक्सीडंटमुळं या सुरकुत्या न येण्यासाठी मदत होते. शेंगदाणे खाणाऱ्या व्यक्तींची त्वचा असलेल्या वयापेक्षा कमी वयाची दिसते.
७. हाडं मजबूत होतात – रोज शेंगदाणे खाल्ल्यामुळं हाडं मजबूत होतात. यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम आणि विटामिन डी ची योग्य मात्रा असल्यामुळं हाडं मजबूत होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -