Wednesday, December 11, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीBenefits of eating radish : हिवाळ्यात मुळा का खावा? वाचा फायदे

Benefits of eating radish : हिवाळ्यात मुळा का खावा? वाचा फायदे

Subscribe

मुळ्याची भाजी म्हटले की, अनेकजणांची नाक मुरडली जातात. पण, मुळ्याची भाजी शरीरासाठी फायदेशीर असते हे आपण लक्षात घ्यायला हवे. मुळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, बी, सी, प्रोटीन, सल्फर, सोडीयम, मॅग्नेशियम आणि आयोडीन आढळते. मुळ्यातील हे पौष्टीक घटक अनेक रोगांवर रामबाण उपाय ठरू शकतात. हिवाळ्यात तर आवर्जून मुळा खायला हवा, यामुळे रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच शिवाय अनेक फायदे शरीराला होतात. पाहूयात, हिवाळ्यात मुळा का खायला हवा, त्यामागील कारणे काय आहेत,

रोगप्रतिकारशक्ती –

मुळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. यात व्हिटॅमिन सी आणि अॅटी-ऑक्सीडंट असल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

- Advertisement -

लघवीचे विकार –

लघवीच्या विकारांवर मुळ्याचे सेवन फायदेशीर मानले जाते. त्यामुळे तुम्हाला जर लघवीच्या संबंधित काही समस्या असेल तर मुळ्याचा रस तुम्ही प्यायला हवा.

पोटाशी संबधित तक्रारी-

पोटाशी संबधित तक्रारी कमी करण्यासाठी मुळ्याचे सेवन करायला हवे. मुळ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते. ज्यामुळे पचनसंस्था सुरळीतपणे काम करू शकते.

- Advertisement -

उच्च रक्तदाब –

मुळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहते आणि शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुरळीत होते.

वजनावर कंट्रोल –

मुळा खाल्याने दिर्घकाळ पोट भरलेले राहते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. परिणामी, तुमचे पोट दिर्घकाळ भरलेले राहल्याने तुम्ही काही खात नाही आणि वजन कंट्रोलमध्ये राहते.

त्वचेच्या समस्या –

हिवाळ्यातील त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मुळ्याचे सेवन करायला हवे. मुळ्याच्या सेवनाने त्वचा हायड्रेट राहते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकण्यास सुरूवात होते.

युरीक ऍसिडची समस्या –

मुळ्याच्या पानांचे सेवन केल्याने युरीक ऍसिडची समस्या कमी होते. मुळ्याच्या पानांमध्ये ऍटी-ऑक्सिडंट आणि ऍटी-इफ्लेमेंटरी गुण असतात. या गुणधर्मांमुळे युरीक ऍसिडच्या समस्येपासून आराम मिळतो.

रक्त शुद्धीकरण –

केवळ हिवाळाच नाही तुम्ही नियमित जर मुळ्याच्या पानांचे सेवन केले तर रक्त शुद्ध होते.

डायबिटीस –

डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी आहारात मुळ्याच्या पानांचा समावेश करायला हवा. असे करणे फायद्याचे ठरेल.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini