घरलाईफस्टाईलBenefits Of Exercise:मानसिक तणाव दूर करण्यासाठी दररोज करा व्यायाम

Benefits Of Exercise:मानसिक तणाव दूर करण्यासाठी दररोज करा व्यायाम

Subscribe

आजची तरुणाई हि फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. अनेकजण बॉडी टोंड तसेच शारिरीक फिटनेनसाठी दररोज वर्कआऊट करतांना दिसतात.

 

मानसाचे आयुष्य गेल्या काही दिवसांपुर्वी घडाळ्याच्या काट्यावर धावत होते. पण अचानक आलेल्या या कोरोना व्हायरसने सर्वांच्या बिझी आयुष्याला जणु ब्रेकच लावला. लोकांच्या आयुष्यात कोरोना व्हायसमुळे अनेक समस्या उत्पन्न झाल्या असल्या तरी या मुळे फक्त एक बाब चांगली झाली आहे ती म्हणजे लोकांना पटलेले आहाराचे,व्यायामाचे महत्व. आजच्या काळात तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यत सर्वाना आपल्या शरीराची आरोग्याची काळजी घेण गरजेच झालं आहे. म्हणून आजची तरुणाई हि फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. अनेकजण बॉडी टोंड तसेच शारिरीक फिटनेनसाठी दररोज वर्कआऊट करतांना दिसतात. तर काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइजचा आधार घेतात. हेल्दी लाइफस्टाईलसाठी व्यायाम करणे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. निरोगी फिट आयुष्यासाठीच नव्हे तर रात्री छान झोपोसाठी सुद्धा व्यायाम उपयुक्त आहे. चला तर आज जाणून घेऊया एक्सरसाइज केल्याने आरोग्यासाठी याचा कश्याप्रकारे लाभ होतो.

- Advertisement -

1. तणाव 

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तणावाची छाया निर्माण झाली आहे. आणि हा तणाव दूर करण्यासाठी तुम्ही व्यायामाचा आधार घेऊ शकतात. जर दररोज व्यायाम केल्यास मन शांत राहण्यास तसेच स्ट्रेस लेवल कमी करण्यास व्यायाम करने फायदेशीर ठरु शकते.

2. आनंदी राहण्यास मदत

डेली एक्सरसाइज केल्याने आनंदी राहण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकतात. एक्सरसाइज शरीराला फिट ठेवण्यास मदत करु शकते. पण तुम्हाला याचा दररोज सराव करणे अनिवार्य आहे तरच तुम्हाला याचा प्रभाव जाणवू शकतो आणि तुमचा मुड बॅलेंस राहू शकतो.

- Advertisement -

3. गाढ झोपेसाठी व्यायम ऊपयुक्त

अनेक लोकांना चिंता,तणाव,कामाच्या प्रेशरमुळे झोप येणे कठीण होते.अशा लोकांनी एक्सरसाइज केली पाहीजे.एका आभ्यासानूसार असे सांगण्यात आले आहे की एक्सरसाइज केल्याने डोके शांत रहते. तसेच रोज व्यायाम केल्याने आपल्याला शांत झोप लागते

4. स्थूलपणा

जर तुमचे वजन वाढले असेल तर तुम्हाला डेली एक्सरसाइज करण्याशिवाय दुसरा पर्याय उपल्बध नाहीये.फक्त डाएट केल्याने तुम्हाच्या शरीरावर त्याचा काहीच परीणाम होणार नाही पण तुम्ही जर व्यायामाचा आधार घेतला तर तुम्ही काही दिवसातच फिट होऊ शकतात


हे हि वाचा – Sleeping Tips:सोफ्यावर झोपणे ठरु शकते धोकादायक,सोफ्यावर झोपणे म्हणजे आजारांना …


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -