हिवाळ्यात मेथीची भाजी बाजारात सर्वत्र दिसू लागते. मेथीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याशिवाय मेथीची पाने देखील औषधी गुणधर्मांचा साठा मानली जातात. मेथीच्या भाजीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, फायबर मुबलक प्रमाणात आढळते. जे शरीरातील विविध व्याधींपासून आराम देण्यासाठी उपयुक्त ठरतात. तज्ञही हिवाळ्यात आवर्जून मेथीची भाजी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे जाणून घेऊयात, हिवाळ्यात मेथीची भाजी का खायला हवी? आणि त्याचे फायदे काय आहेत.
- मेथीच्या भाजीमध्ये दाह विरोधी गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज कमी होते.
- मेथीच्या भाजीच्या सेवनाने त्वचा निरोगी राहते. या भाजीत असणारे अॅटी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचा मुलायम, चमकदार बनवतात.
- मेथीच्या भाजीत असणारे व्हिटॅमिन सी, अॅटी- ऑक्सिडंट, कॅल्शियम शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. त्यामुळे हिवाळ्यातील थंडीमुळे होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.
- एका संशोधनानुसार, मेथीच्या भाजीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये राहते. ज्यामुळे टाइप 2 डायबिटीसचा धोका कमी होतो.
- मेथीची भाजी शरीर उबदार ठेवण्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे तज्ञ देखील हिवाळ्यात मेथीची भाजी खाण्याचा सल्ला देतात.
- वजन कमी करण्यासाठी मेथीची भाजी उपयुक्त ठरते. जर तुम्ही काही दिवस मेथीच्या भाजीचे सेवन केलेत तर बऱ्याच प्रमाणात फॅट्स कमी होऊ शकतात.
- मेथीची भाजी खाल्याने पचनसंस्था निरोगी राहते. पचनसंस्थेशी काही निगडीत काही समस्या असतील तर आराम मिळण्यासाठी मेथीची भाजी अवश्य खा.
- winter कोलेस्ट्रोल वाढले की, हृदयाचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे खराब कोलेस्ट्रोल नियंत्रणात आणण्यासाठी मेथीची भाजी खायला हवी. मेथीच्या भाजीतील पोषक घटक कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यात प्रभावी ठरतात.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde