घरलाईफस्टाईलआरोग्यासाठी गुणकारी लसणाचा चहा

आरोग्यासाठी गुणकारी लसणाचा चहा

Subscribe

आपण आल्याचा चहा, गवती चहा नेहमीच पितो. पण लसूणाचा चहा कधी प्यायला नसेल. लसूणाचा चहा प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. स्वास्थ्यासंबंधी असलेल्या अनेक समस्या या लसूणाच्या चहाने दूर होतात.

जेवणात स्वाद आणण्यासाठी पदार्थांमध्ये लसूणाचा वापर केला जातो. लसूण ही भारतीय स्वयंपाकाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. लसूणाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्हाला जर लसूण खायला आवडत असेल तर वेगळ्या पद्धतीनेही तुम्ही लसणाचे सेवन करू शकता. आपण आल्याचा चहा, गवती चहा नेहमीच पितो. पण लसूणाचा चहा कधी प्यायला नसेल. लसूणाचा चहा प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. स्वास्थ्यासंबंधी असलेल्या अनेक समस्या या लसूणाच्या चहाने दूर होतात. चला तर पाहूयात लसणाचा चहा पिण्याचे गुणकारी फायदे

  • लसणाच्या चहाचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात. हर्बल चहामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. लसणाचा चहा शरीर स्वास्थासाठी खूप उपयोगी आहे. रिकाम्या पोटी लसणाचा चहा प्यायल्याने मेटॉबिलिजम वाढण्यास मोठी मदत होते. त्याचबरोबर शरीराची पचनशक्ती सुधारते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.
  • लसणाचा चहा प्यायल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे लसणाचा चहा पिणे कधीही उत्तम. त्याचबरोबर लसणाचा चहा प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मोठी मदत होते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
  • जर वजन वाढण्याची समस्या असेल तर लसणाचा चहा पिणे कधीही उत्तम ठरेल. लसणाचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने भूक कमी लागते. त्याचप्रमाणे लसणाचा चहा प्यायल्याने फॅट बर्न होण्यासाठीही मदत होते. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मोठी मदत होते. लसणाचा चहा प्यायल्याने कोलेस्ट्राल व्यवस्थित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर अनेक आजारांपासून बचाव होण्यासाठी लसणाचा चहा उपयोगी ठरतो.

लसणाचा कसा बनवाल?

तीन कप पाणी घ्या. ते गरम करून घ्या. ३ ते ४ लसणाच्या पाकळ्या घ्या. त्या पाकळ्या छोट्या आकारात चिरून घ्या. त्यानंतर उकळत्या पाण्यात लसूणाचे काप टाका. ते पाणी थोडा वेळ उकळू द्या. नंतर त्या मध्ये लिंबाचा रस आणि मध घाला. पाणी उकळत्यावेळी तुम्ही त्यात हवे असल्यास आल्याचे कापही टाकू शकता. अशाप्रकारे लसणाचा गरमा गरम आणि गुणकारी चहा तयार.

- Advertisement -

हेही वाचा – हिवाळ्यात सर्दी, खोकल्यापासून असा करा आपला बचाव

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -