प्रत्येकालाच आपली त्वचा नितळ आणि तजेलदार असावी असे वाटत असते. त्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. त्वचेला कोमल आणि नितळ करण्यासाठी द्राक्षाच्या बियांच्या तेल खूप महत्त्वाचे ठरते. या तेलामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदातही द्राक्षाच्या बियांच्या तेलाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
द्राक्षाच्या बियांच्या तेलाचे फायदे
- सुरकुत्या दूर करते
द्राक्षाच्या बियांच्या तेलामध्ये अँटी ऑक्सीडंट असते. याशिवाय त्यामध्ये व्हिटॅमिन-ई आणि ओमेगा-6 हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे हे तेल सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून आणि प्रदूषणापासून चेहऱ्याला वाचवते. हे तेल त्वचेला आतून हायड्रेट करते.
- पेशींसाठी उपयुक्त
द्राक्षांच्या बियांचे तेलाच्या वापरामुळे चेहऱ्यावरील डाग निघून जातात. याशिवाय हे तेल चेहऱ्यावरील डेड सेल्स हटवण्यासाठी मदत करते.ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
- उत्तम स्किन टोनर आणि मेकअप रिमूव्हर
तुम्ही या तेलाचा उपयोग स्किन टोनर किंवा मेकअप रिमूव्हर म्हणून करु शकता. मात्र, हे वापरण्या अगोदर त्यात गुलाबजल मिसळणे आवश्यक आहे. या तेलामुळे डार्क सर्कल नाहीसे होण्यास मदत होते.
- त्वचेच्या रोगापासून दूर राहण्यास उपयुक्त
आयुर्वेदात द्राक्षाच्या बियांचे तेल खूप उपयुक्त मानले जाते. यामुळे त्वचेचे रोग सोरायसिस, एक्जिमा,अॅलर्जी दूर होते.
द्राक्षांच्या बियांचे तेल वापरण्याची योग्य पद्धत
द्राक्षांच्या बियांचे तेल हे डायरेक्ट वापरु नये कारण ते खूप स्ट्रॉंग असते. त्यामुळे हे तेल वापरताना कोणतेही हर्बल तेल किंवा खोबरेल तेल त्यात मिक्स करुन त्यानंतरच या तेलाचा वापर करावा.