Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health दिवसातून 10 मिनिट पोटभरून हसा आणि फिट राहा

दिवसातून 10 मिनिट पोटभरून हसा आणि फिट राहा

Subscribe

हसणे आरोग्यासाठी बेस्ट मानले जाते. असे म्हटले जाते की, सकाळी 10 मिनिटांचे हसणे सुद्धा तुमचा संपूर्ण दिवस आनंद घालवणारे असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा सकाळी जोर-जोरात हसण्याची सवय लावा. तर पाहूयात खळखळून हसण्यामुळे नक्की काय फायदे होतात याच बद्दल तज्ञ काय म्हणतात हे पाहूयात. (Benefits of Laughter)

दररोज हसण्याने इम्युन सिस्टिम मजबूत होते. यामुळे शरिरात ऑक्सिजनचा स्तर वाढला जातो आणि सर्व अवयवयांमध्ये रक्ताद्वारे ऑक्सिजन अगदी सहज पोहचते. या प्रक्रियेमुळे तुमचे सर्व अवयव सुरळीत काम करु शकतात.

- Advertisement -

तज्ञ असे म्हणतात की, एकाने हसणे सुरु केले की, दुसरा सुद्धा त्याला पाहून हसू लागतो. खरंतर हसण्याने हार्ट रेट वाढतो. या दरम्यान तुम्ही जर दीर्घ श्वास घेतलात तर शरिरात ऑक्सजनचे प्रमाम वाढले जाते. हसल्याने शरिरात एक प्रकारचे केमिकल उत्सर्जित होते जे हृदयाच्या हेल्दसाठी फायदेशीर मानले जाते. त्याचसोबत डोपामाइन नावाचे हार्मोनचा स्तर ही वाढतो, यामुळे तुम्ही आनंदित असल्याचा अनुभव येतो. तसेच हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची जोखिम कमी होते.

- Advertisement -

जोरात हसल्याने फुफ्फुस मजबूत होतात आणि तुमचे ब्लड सर्कुलेशन उत्तम होते. तसेच इंन्फेक्शनचा धोका ही कमी होतो. जर तुम्ही 30-40 मिनिट हसाल तर 50-100 कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे हसल्याने सुद्धा वजन कमी होते. तसेच तणाव कमी झाल्याने कोर्टिसोल हार्मोन कमी होतात. कोर्टिसोलला स्ट्रेस हार्मोन असे ही म्हटले जाते. कोर्टिसोल कंट्रोलमध्ये असेल तर वजन ही नियंत्रणात राहते.

हसण्याचे फायदे काय आहेत?
-आत्मविश्वास वाढतो
जेव्हा एखादा व्यक्ती हसतो तेव्हा तो पॉझिटिव्हिटीकडे जात असतो. सकारात्मकता जर असेल तर आपण कोणतेही काम मनं लावून करु शकतो. आपलं डोकं त्यावेळी शांत आणि टेंन्शन फ्री राहते. तसेच आत्मविश्वास ही यावेळी वाढलेला दिसतो.(Benefits of Laughter)

-तणाव दूर होतो
हसल्याने डिप्रेशन दूर होते. ज्या व्यक्तीला हसण्याची सवय आहे तो भले टेंन्शन मध्ये असला तरीही आपल्या पॉझिटिव्ह सवयींमुळे सहज या स्थितीतून बाहेर पडू शकतो.

-नाती मजबूत होतात
आजकालच्या धावत्या लाइफस्टाइलमुळे नात्यांना फारसा वेळ देता येत नाही. परंतु जेव्हा एखादा व्यक्ती हसून तुमच्याशी बोलतो तेव्हा अशा व्यक्तीला फार पसंद केले जाते. हसत-खेळत बोलणाऱ्या व्यक्ती आनंदित दिसतात आणि त्यामुळेच अन्य व्यक्ती सुद्धा अशांसोबत नाती जोडण्यास फार उत्सुक असतात.

- Advertisment -

Manini