आरोग्यासाठी पपई खाणे फायद्याचे असते. पपई नियमितपणे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. पपई खाल्ल्यानंतर पपईच्या बिया साधारणपणे फेकून देण्यात येतात. पण, खरं तर पपईप्रमाणेच पपईच्या बिया शरीरासाठी गुणकारी आहेत. पपईच्या बियांचा वापर आरोग्य, केस आणि सौंदर्यासाठी करण्यात येतो. चला तर मग जाणून घेऊयात, पपईच्या बियांचे फायदे कोणते आहेत.
पपईच्या बियांचे फायदे –
- तज्ञांच्या मते, पपईच्या बियांमध्ये पाचक एन्झाइम्स असतात. या एन्झाइम्समुळे पचन सुरळीत होते. जर तुम्ही बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्यांशी झुंजत असाल तर पपईच्या बिया खायला हव्यात. हा उपाय करणे फायदेशीर ठरेल.
- रक्तदाब असेल तर आहारात पपईच्या बियांचा समावेश करावा. पपईच्या बियांच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
- व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण अशा पपईच्या बिया असतात. व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत झाल्यावर संसर्गाचा धोका कमी राहतो.
- पपईच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनास फायदेशीर असते. याशिवाय फायबरमुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे तुम्ही अतिरीक्त खात नाही आणि वजन नियंत्रणात राहते.
- पपईच्या बिया मासिक पाळीच्या दिवसात खाल्ल्याने वेदंनापासून आराम मिळतो.
- पपईच्या बियांमुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
- पपईच्या बियांमध्ये भरपूर ऍटी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि आयर्न आढळतात. ही पोषकतत्त्वे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे केसांशी संबंधित समस्या असतील तर पपईच्या बिया खायला हव्यात.
- केसांप्रमाणेच सौंदर्यासाठी पपईच्या बिया वरदान असतात. चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा आदी समस्या असतील तर पपईचा फेस पॅक तुम्ही वापरू शकता.
या पद्धतीने खाव्यात बिया –
- पपईच्या बिया उन्हात वाळवून घ्याव्यात.
- वाळवल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.
- या वाळवलेल्या बियांचे सेवन तुम्ही करू शकता.
हेही पाहा –