हिवाळ्याच्या ऋतूत पेरू हमखास बाजारात दिसतात. या दिवसात पेरू अवश्य खावा असा सल्ला दिला जातो. पेरू चवीला स्वादिष्ट असतोच शिवाय आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आढळते. त्यामुळे वेट लॉससाठी पेरू खाणे सर्वात सोपा उपाय मानला जातो. पेरूमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, कॉपर, कॅल्शिअम, झिंक आणि फॉस्फरस यांसारख्या पोषक घटकांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे आवडीने पेरू खाल्ला जातो. अनेकांना भाजलेला पेरू खायला जास्त आवडतो. त्यावर तिखट-मीठ लावून पेरू खाल्ला जातो. पण, याचे फायदे काय आहेत, हे अनेकांना ठाऊक नसते. जाणून घेऊयात, भाजलेला पेरू खाण्याचे फायदे,
भाजलेला पेरू खाण्याचे फायदे –
- एलर्जीवर उपाय म्हणून भाजलेला पेरू खावा. भाजलेल्या पेरूच्या सेवनाने एलर्जीवर आराम मिळतो.
- हिवाळ्यात कफाचा त्रास अनेकांना होतो. अशावेळी तुम्ही भाजलेला पेरू खायला हवा. भाजलेल्या पेरने कफ पातळ होतो आणि बाहेर पडण्यास मदत होते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भाजलेला पेरू खावा. पेरूच्या सेवनाने कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते.
- बद्धकोष्ठतेच्या समस्येवर भाजलेल्या पेरूचे सेवन करणे फायद्याचे ठरते. भाजलेल्या पेरूमुळे मल:निस्सारण सुरळीत होते.
- भाजलेल्या पेरूच्या सेवनाने भूक वाढण्यास मदत होते. तुम्हाला दिवसभर भूक लागत नसेल तर भाजलेला पेरू खाण्यास सुरूवात करावी, फायद्याचे ठरेल.
- भाजलेला पेरू खाल्याने शरीरात ऊर्जा वाढते. त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा दूर होतो.
पेरू भाजायचा कसा ?
- सर्वात आधी पॅन गरम करून घ्यावा.
- यानंतर पेरू कापून घ्या आणि त्यावर काळे मीठ टाका.
- तव्यावर पेरू भाजून घ्या. 5 मिनिटे झाकणही ठेवा.
- या पद्धतीने दोन्ही बाजू भाजून घ्याव्यात.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde