Saturday, February 8, 2025
HomeमानिनीHealth Tips : रोज उन्हात काहीवेळ बसण्याचे आश्चर्यकारक फायदे

Health Tips : रोज उन्हात काहीवेळ बसण्याचे आश्चर्यकारक फायदे

Subscribe

सूर्यप्रकाशामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आपल्या आरोग्यासाठी हा सर्वात महत्वाचा घटक देखील आहे. यापासून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते जे आपल्या हाडांना मजबूत करायला मदत करते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते. आज आपण रोज उन्हात काहीवेळ बसण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊयात.

व्हिटॅमिन डी

सूर्यप्रकाशापासून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते. हे हाडे मजबूत करण्यास मदत करते. याने ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो आणि शरीराला कॅल्शिअम मिळते.

मानसिक आरोग्य चांगले राहते

benefits of sitting some time in the sun every dayसूर्यप्रकाशामुळे सेरोटोनिन हार्मोन तयार होते, जे नैसर्गिकरित्या मनःशांती देणारे हार्मोन आहे. यामुळे डिप्रेशन, चिंता आणि तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

benefits of sitting some time in the sun every dayसूर्यप्रकाशामुळे टी-सेल्स म्हणजे रोगप्रतिकारक पेशी सक्रिय होतात, त्यामुळे सर्दी, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार आपल्याला होत नाही. रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

रक्तदाब नियंत्रित राहते

सूर्यप्रकाश त्वचेवरील नायट्रिक ऑक्साइड सक्रिय करतो, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

स्लीप सायकल सुधारते

benefits of sitting some time in the sun every dayसकाळच्या उन्हामुळे मेलनिन हार्मोन नियंत्रित राहते. ज्यामुळे झोप चांगली राहते. अनिद्रेची समस्या कमी होते.

त्वचेसाठी फायदेशीर

benefits of sitting some time in the sun every day

योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाल्यास अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचेवरील अ‍ॅक्ने, सोरायसिस आणि इतर समस्या कमी होऊ शकतात. तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चांगली राहील.

कर्करोगाचा धोका कमी होतो


benefits of sitting some time in the sun every dayएका संशोधनानुसार, नियमित सूर्यप्रकाश घेतल्याने काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो, विशेषतः त्वचा, स्तन आणि आतड्यांचा कर्करोग. त्यामुळे काहीवेळ उन्हात बसने फायदेशीर आहे.

कधी आणि किती वेळ उन्हात बसावे?

  • सकाळी 8 ते 11 च्या दरम्यान किंवा सायंकाळी 4 नंतर सूर्यप्रकाश घेणे अधिक फायदेशीर असते.
  • 15-30 मिनिटे रोज उन्हात बसणे योग्य आहे.
  • उन्हात बसताना सनस्क्रीन किंवा थेट तीव्र उन्हापासून बचाव करावा, विशेषतः दुपारच्या वेळेत.

हेही वाचा : Health Tips : हृदयासाठी फायदेशीर अॅवोकॅडो


Edited By : Prachi Manjrekar

Manini