हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक जास्त प्रमाणात खाल्ला जातो. पोषकतत्वांनी परिपूर्ण अशी पालकाची भाजी थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात खाल्ली जाते. पालकाची केवळ भाजीच नाही तर पालक पनीर, पालक पुरी, भजी, परोठे असे विविध पदार्थ खाण्यात येतात. ऍटी-ऑक्सिडंट, कॅल्शिअम, सोडिअम, क्लोरिन, फॉस्फरस, क्षार, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी सारख्या अनेक पोषकतत्वांनी परिपूर्ण असते. पालक खाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतात. सर्वात महत्वाचे म्हणजे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. जाणून घेऊयात, पालक खाल्याने बद्धकोष्ठतेसह आणखी कोणत्या समस्येपासून आराम मिळतो.
बद्धकोष्ठतेपासून आराम –
बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे पोटाचे आरोग्य स्थिरस्थावर नाही आहे. अनेकजणांना पोटाच्या तक्रारी वारंवार जाणवत आहेत, जसे की, गॅस होणे, अपचन समस्या जाणवतात. यात प्रामुख्याने बद्धकोष्ठतेची समस्या जाणवते. बद्धकोष्ठतेच्या तक्रारीवर पालक खाणे रामबाण उपाय ठरेल. पालक खाल्याने पचन व्यवस्थित होते. ज्यामुळे पोटाच्या तक्रारी जाणवत नाही.
हार्मोन्स बॅलन्स होतात –
पालक खाल्लाने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखले जाते. महिलांनी तर आवर्जुन पालक खायला हवा. पालक खाल्याने अनियमित पिरीयड, क्रॅम्प, PCOS सारखी लक्षणे कमी होतात.
लोहाची कमतरता दूर होते –
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर पालक खायला हवा. पालकातील आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते, जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवते. परिणामी, ऍनिमिया दूर होतो.
हाय ब्लड प्रेशर –
पालकातील नायट्रेट ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते. तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर पालकाचा रस किंवा भाजी नियमित खाणे फायद्याचे ठरेल.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde