तुळशीच्या पानात अँटी- बॅक्टेरियल, अँटी सेप्टिक आणि अँटी ऑक्सीडेंट्स गुणधर्म आढळतात. आयुर्वेदानुसार फार पूर्वीपासून तुळशीच्या पानांचा उपयोग विविध आजारांवरील रामबाण उपाय म्हणून करण्यात येतो. तज्ज्ञ सुद्धा सकाळी तुळशीच्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. तुळशीच्या पानांच्या सेवनाने केवळ सर्दी खोकलाच नाही तर अनेक आजार बरे होतात. सर्वात महत्वाचे म्हणजे तुळशीची पाने रिकाम्या पोटी खाल्यास अधिकच फायदे शरीरास होतात.
तुळशीची पाने खाण्याचे फायदे –
सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून तुळशीची पाणी खाल्ली जातात. पावसाळा सुरु झाला आहे यात प्रामुख्याने सर्दी-खोकला होतोच. सर्दी – खोकल्याने त्रस्त झाले असाल तर रिकाम्या पोटी तुळशीची पाने खा. आराम मिळेल.
पचनाच्या समस्येवर तुळशीची पाने खावेत असे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. जर तुम्हाला वारंवार पोट बिघडणे, गॅस, पोट फुगणे अशा तक्रारी जाणवत असतील तर रिकाम्या पोटी तुळशीची पाने अवश्य खा.
तुळशीची पाने स्ट्रेसपासून मुक्ती देण्यातही फायदेशीर असतात. आजकालच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकजण स्ट्रेसमधून जात आहे. त्यामुळे तुळशीची पाने खायला सुरवात करावी.
डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी तुळशीची पाने अवश्य खावीत.
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी 3 ते 4 तुळशीची पाने अवश्य खावीत.
रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने त्वचेची संबधीत समस्या कमी होतात. तुळशीच्या पानांचे सेवनाने त्वचा उजळण्यास मदत होते.
हेही पाहा :
Edited By – Chaitali Shinde