Sunday, February 16, 2025
HomeमानिनीBeautyWooden Comb : हेल्दी केसांसाठी वापरावा लाकडी कंगवा

Wooden Comb : हेल्दी केसांसाठी वापरावा लाकडी कंगवा

Subscribe

केस आपल्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला आपले केस लांब, घनदाट आणि चमकदार हवे असतात. यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक हेअर प्रॉडक्टस जसे की, हेअर ऑइल, सिरमचा वापर करण्यात येतो. केवळ हेअर प्रॉडक्टच नाही तर हेअर स्पासारखे केसांची ट्रिटमेंट केली जाते. पण, परिणाम मनासारखे मिळत नाही. अशावेळी  केस निरोगी राहण्यासाठी लाकडी कंगव्याचा वापर करायला हवा. केसांसाठी लाकडी कंगवा सर्वोत्तम मानण्यात येतो.

कोणता लाकडी कंगवा वापराल –

कडूलिंब किंवा चंदनापासून तयार केलेल्या लाकडी कंगव्याचा वापर करावा. या कंगव्यामुळे केसांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.

फायदे – 

  • केसांमधील गुंता सोडविण्यासाठी लाकडी कंगवा वापरणे फायद्याचे ठरते. लाकडी कंगव्याने केस विंचरल्याने केसांची चमक टिकून राहते.
  • केस मजबूत, मऊ आणि चमकदार होण्यासाठी केसांचा स्कॅल्प निरोगी असणे गरजेचे आहे. केसांच्या स्कॅल्पवर परिणाम झाल्यावर केसांच्या एकूणच आरोग्यावर परिणाम होतो.
  • केसांचा स्कॅल्प निरोगी राहण्यासाठी प्लास्टिकचा कंगवा न वापरता लाकडी कंगव्याचा वापर करावा.
  • लाकडी कंगव्यामुळे त्वचेला इजा होत नाही. याशिवाय लाकडी कंगव्याच्या दातांमुळे डोक्याची मालिश होते. मालिश झाल्यामुळे मन आणि डोके शांत होते.
  • लाकडी कंगव्याचा नियमित वापर केल्यास केस मजबूत होतात. केस मजबूत झाल्यामुळे केसांची वाढ उत्तमरित्या होते.
  • लाकडी कंगव्याला नैसर्गिक ऍटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्याचा धोका संभवत नाही.
  • लाकडी कंगव्याने केस विंचरल्यावर केस ओढले जात नाही आणि केस तुटत नाही.
  • तेल लावल्यावर केस लाकडी कंगव्याने विंचरल्यामुळे केसांच्या मुळांची मालिश होते. हेल्दी केसांसाठी केसांची झालेली मालिश उपयुक्त ठरते.
  • लाकडी कंगव्यामुळे केस फ्रिजी होत नाहीत.

 

 

 

हेही पाहा –

Manini