Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीBenefits Of Walking Barefoot : अनवाणी पायाने गवतावर चालण्याचे फायदे

Benefits Of Walking Barefoot : अनवाणी पायाने गवतावर चालण्याचे फायदे

Subscribe

चालणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्वात सोपा व्यायाम आहे. सकाळी ताज्या हवेत चालल्याने शरीराला बरेच फायदे होतात. आपण बरेच जण असे पाहिले असतील की, जे सकाळी गवतावर अनवाणी पायाने चालतात. खरं तर, आरोग्याच्या दृष्टीने गवतावर अनवाणी पायाने चालणे फायदेशीर आहे. रोज सकाळी केवळ 10 ते 15 मिनीटे गवतावर अनवाणी पायाने चालणे कसे फायदेशीर ठरते, पाहूयात

गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे –

निद्रानाशेवर प्रभावी –

जर तुम्ही निद्रानाशेच्या समस्येने त्रस्त असाल तर दररोज काही वेळ गवतावर अनवाणी चालण्याची सवय लावा. गवतावर अनवाणी चालल्याने रात्री शांत झोप लागण्यास मदत होते.

मासिक पाळीच्या वेदनेवर उपयुक्त –

महिलांना मासिक पाळीच्या वेदनेपासून दिलासा देण्यासाठी काही वेळ गवतावर चालणे उपयुक्त ठरेल. गवतावर अनवाणी पायाने चालल्याने मुड स्विंग्स, पोटदूखी, क्रॅम्स आदीपासून दिलासा मिळू शकतो.

हार्मोन्सवर प्रभावी –

महिलांना हार्मानल असंतुलनामुळे मानसिक आणि शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही फक्त 10 मिनीटे गवतावर अनवाणी चालल्याने नक्कीच फायदा होऊ शकतो.

डोळ्यांसाठी उपयुक्त –

गवतावर अनवाणी पायाने चालल्याने डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते. खरं तर, पायातील प्रेशर पॉईट डोळ्यांच्या मज्जातंतूशी जोडलेला असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही गवतावर अनवाणी पायाने चालला तेव्हा पायांचे गवतावरील प्रेशर डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

पायांच्या सुजेवर प्रभावी –

जर तुम्ही पायांना येणाऱ्या सुजेच्या समस्येने त्रस्त असाल तर अशा परिस्थितीत 10 ते 15 मिनिटे अनवाणी पायाने गवतावर जरूर चाला. या उपायाने पायांची सुज नक्कीच कमी होऊ शकते. तसेच गवतावर अनवाणी पायाने चालल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास फायदेशीर –

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही अनवाणी पायाने गवतावर चालायला हवे. गवतावर अनवाणी पायाने चालल्याने मज्जासंस्थेला चालना मिळते. परिणामी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini