प्रेग्नन्सीचा काळ कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात बदल आणणारा असतो. या अवस्थेत अनेक शारीरिक आणि मानसिक बदलाव स्त्रीच्या शरीरात होतात. प्रेग्नन्सीचा काळात स्त्रीला आहार, राहणीमान, दिवसाचे रूटीन या सर्वच गोष्टींची काळजी घेण्यास सांगितले जाते. यासोबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे चालण्याचा सल्ला दिला जातो. प्रेग्नन्सीमध्ये चालणे बाळासह आईच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. जाणून घेऊयात, प्रेग्नन्सीमध्ये चालल्याने शरीराला कोणते फायदे होतात,
शरीराला होतात हे फायदे –
- केवळ प्रेग्नन्सीच्या काळातच नाही तर सामान्य व्यक्तींसाठी दररोज चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. चालणे हा एरोबिक व्यायामाचा एक प्रकार आहे. नियमित चालल्याने हृदयाचे ठोके सुरळीत पडतात. ज्यामुळे फुफ्फुसे मजबूत होण्यास मदत मिळते आणि हृदय हेल्दी राहते.
- प्रेग्नन्सीमध्ये अनेक महिलांना प्रचंड थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत तुम्हाला चालणे फायद्याचे ठरेल. चालल्याने थकवा वाढण्याऐवजी अधिक फ्रेश वाटते. ज्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते. चालल्याने संपूर्ण शरीरात रक्ताचा आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे थकव्यावर सहजपणे मात करता येते.
- चालल्याने मूड सुधारतो. खरं तर, जेव्हा तुम्ही चालता तेव्हा शरीरात एंडोर्फिन हार्मोन रिलीज होतो, ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो आणि स्ट्रेस, डिप्रेशन जाणवत नाही.
- चालल्याने प्रेग्नन्सीमधील वाढलेलं वजन कंट्रोलमध्ये आणण्यात मदत मिळते. चालल्याने कॅलरीज बर्न होतात, जे बाळासह आईच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
- प्रेग्नन्सीमध्ये चालल्याने नितंबातील स्नायू आणि सांधे मजबूत होतात, ज्यामुळे डिलिव्हरीदरम्यान महिलेला रिलॅक्स वाटते.
- नियमित चालल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि डायबिटीसचा धोका उद्भवत नाही.
किती वेळ चालावे?
प्रत्येक महिलेचे आरोग्य वेगळे असते. तुम्ही चालण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ला घेऊ शकता. साधारणपणे, प्रेग्नंट महिलांनी पहिल्या आणि तिसऱ्या महिन्यात 40 ते 60 मिनिटे चालावे, असे सांगितले जाते. तिसऱ्या महिन्यात 30 मिनिटे चालावे, असा सल्ला दिला जातो.
हेही पाहा –