Monday, January 13, 2025
HomeमानिनीWater Chestnut : हिवाळ्यात आवर्जून खावा शिंगाडा; होतील अनेक फायदे

Water Chestnut : हिवाळ्यात आवर्जून खावा शिंगाडा; होतील अनेक फायदे

Subscribe

हिवाळ्यात बाजारात शिंगाडा दिसू लागतो. शिंगाड्याला इंग्रजीत वॉटर चेस्टनट असे म्हणतात. पोषक तत्वांनी परिपूर्ण अशा शिंगाड्याचे हिवाळ्यात आवर्जून सेवन करावे असे सांगितले जाते. शिंगाड्यात कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए, सी, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शिंगाड्याच्या सेवनाने शरीराला विविध फायदे होतात. शिंगाडा कच्चा, उकडवून खाल्ला जातात. याशिवाय उपवासात शिंगाड्याच्या पीठापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. जाणून घेऊयात, शिंगाडा खाण्याचे फायदे

शिंगाडा खाण्याचे फायदे –

  • शिंगाडे पचनासाठी फायदेशीर मानले जातात. हिवाळ्यात शिंगाडे खाल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि आतड्यांचे आरोग्यही उत्तम राहते.
  • शिंगाड्यात लॉरिक ऍसिड असते,ज्यामुळे केस मजबूत होतात. त्यामुळे केसांचे आरोग्य राखण्यासाठी उकडलेले शिंगाडे तुम्ही खाऊ शकता.
  • हिवाळ्यात व्हायरल इनफेक्शनचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत तुम्ही रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी शिंगाडे खाऊ शकता. यातील अॅटीव्हायरल आणि अॅटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.
  • हिवाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी शिंगाडा आवर्जून खायला हवा. शिंगाड्याच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहते. उकडलेल्या शिंगाड्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
  • घशाच्या तक्रारी दूर करण्यासाठी शिंगाडा खायला हवे. शिंगाड्यातील अॅटी-ऑक्सिडंट गुणधर्म घशाच्या तक्रारी कमी करतात. विशेष करून घसा खवखवणे, टॉन्सिलच्या समस्येपासून आराम मिळतो.
  • शिंगाड्यातील कॅल्शिअम दात आणि हाडांसाठी उत्तम मानले जातात.
  • उपवास असेल तर आवर्जून शिंगाड्याचे सेवन करावे. शिंगाड्यामुळे शरीराला उर्जा मिळते.
  • लो ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी शिंगाड्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. यात सोडीअमचे प्रमाण खूप जास्त असते, जे कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर असते.
  • शिंगाड्यात कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही शिंगाडा खायला हवा. कारण शिंगाड्यामुळे पोट भरलेले राहते. परिणामी, वजन कंट्रोलमध्ये राहते.
  • शिंगाडे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते. ज्यामुळे शरीर आतून निरोगी राहते. परिणामी, त्वचा आणि केसही निरोगी राहतात.
  • तुम्हाला निद्रानाशेची समस्या असेल तर तुम्ही शिंगाडा खायला हवा. शिंगाड्यातील गुणधर्मांमुळे तुम्हाला चांगली झोप लागते.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini