घरलाईफस्टाईलआल्याच्या सेवनाचे १० आरोग्यदायी फायदे

आल्याच्या सेवनाचे १० आरोग्यदायी फायदे

Subscribe

सर्दी झाली की आवर्जुन आल्याचा चहा पितात.आले हे फक्त सर्दी पडश्यावर गुणकारी नसून त्याहीपेक्षा अनेक रोगांवर लाभदायी आहे.जाणून घेऊया त्याविषयी

पावसात भिजल्यावर गरम चहा पिण्याची इच्छा होते. मग तो चहा आल्याचा असेल तर आणखीनच ‘सोनेपे सुहागा.’ आल्याच्या चहाचे फायदे आपल्याला माहीतच आहेत. त्या व्यतिरिक्तही आल्याचे अनेक आरेग्यदायी फायदे आहेत. आल्यामध्ये व्हिटामिन सोबतच कॉपर आणि मँगनिज भरपूर प्रमाणात असतं. आल्याच्या रसामध्ये महत्वपूर्ण घटक असतात ज्यामुळे शरीराला अनेक आरोग्यदायी लाभ मिळातात. जाणून घेऊया त्याविषयी.

१) शरीरावरची सूज कमी करतं

आल्याचा ज्युस शरिरावरची सुज कमी करण्यास मदत करतं. त्यामध्ये अँटिऑक्सीडंट्स असतात जे शरिरातील रक्त प्रवाह सुरळीत करण्यास मदत करतात. सोबतच जॉईंटपेन कमी करतात.

- Advertisement -

२) कॅन्सर प्रतिबंधक

कॅन्सरसारख्या भयानक आजारापासून वाचवतात. आल्यामधील घटक कॅन्सर रोगाची वाढ करणाऱ्या पेशींना नष्ट करुन टाकण्यात मदत करतं. खास करुन स्तनांमधील कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणाऱ्या पेशींची वाढ रोखतं.

३) ब्लड प्रेशर कंट्रोल-

आल्यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात, त्यामुळे ब्लड प्रेशरवर नियंत्रण राहण्यास मदत मिळते.

- Advertisement -

४) मायग्रेनपासून मुक्ती-

आल्याचा रस मायग्रेनसारख्या दुखण्यावर खूप असरदार ठरतो.
त्यासोबतच इतरही दुखण्यांवर आल्याच्या रसाने लवकर आराम मिळतो.

५) पचन समस्या-

आल्याचा रस पचना संबंधीत सर्व आजारांवर अत्यंत लाभदायी ठरतो.
पोटाचे सर्व आजार दूर करण्यास मदत करतं.

६) थायरॉईडचा त्रास कमी करतं

आल्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे थायरॉईड सारख्या आजारावर मात करण्यास मदत मिळते.

७) कोलेस्ट्रॉल कमी करतं-

आल्याचा ज्युस नेहमी सेवन केल्यास शरिरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट पेशंटसाठी अद्रकाचा ज्यूस खूप लाभदायी आहे.

८) सर्दीमध्ये लाभदायी-

आल्याचा रस सर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियाचा नाश करण्यात मदत करतं. त्यामुळे आल्या रस सर्दीमध्ये खूप लाभदायी आहे.

९) काळे व घनदाट केसांसाठी-

आल्याचा रस आरोग्या बरोबरच सौंदर्य वाढवण्यात देखील महत्वाची भूमिका बजावतं. आल्याचा ज्यूस प्यायल्यामुळे किंवा डायरेक्ट केसांना लावल्याने केसांचे सौंदर्य सुधारण्यास मदत मिळते. आल्याचा रस लावल्याने केस फक्त काळेशार आणि घनदाटच नाही होत तर केसातील कोंडा देखील कमी करतं.

१०) मुरुमांपासून मुक्ती-

आल्यामध्ये असलेले घटक त्वचेशी निगडीत सर्व आजारावर लाभदायी आहे. आल्याच्या रसामध्ये असलेले अँटिऑक्सीडंट्स खास करुन मुरुमांचा त्रास कमी करण्यास मदत करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -