घरताज्या घडामोडीपांंढऱ्या केसांमुळे त्रस्त असाल तर, तुळस आणि आवळ्याचे हे उपाय नक्की करून...

पांंढऱ्या केसांमुळे त्रस्त असाल तर, तुळस आणि आवळ्याचे हे उपाय नक्की करून बघा

Subscribe

खरंतर  तुळस आणि आवळा हे दोनही औषधी वनस्पती आहेत. त्यामुळे यांमध्ये अनेक पोषकत्व उपलब्ध असतात. या पोषकत्वांमुळे केसांना त्याचा चांगला फायदा होतो. 

पांढऱ्या केसांना काळं करण्यासाठी आजकाल बाजारातील वेगवेगळ्या प्रोडक्टचा वापर केला जातो, परंतु त्यानंतरही तुम्हाला जर पांढऱ्या केसांना नैसर्गिक रित्या काळं करायचे असेल तर , तुमच्यासाठी आम्ही तुळस आणि आवळ्याचे रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. या दोन्हीच्या वापराने तुम्ही तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करु शकता. खरंतर  तुळस आणि आवळा हे दोनही औषधी वनस्पती आहेत. त्यामुळे यांमध्ये अनेक पोषकतत्व उपलब्ध असतात. या पोषकत्वांमुळे केसांना त्याचा चांगला फायदा होतो.

तुळस आणि आवळ्याचा उपयोग फक्त केस काळे करण्यासाठीचं नाही तर केसांच्या इतर समस्या देखील दूर करण्यासाठी होतो. केसातील कोंडा कमी होतो, केस गळती कमी होते, केस मजबूत होतोत.

- Advertisement -

या पद्धतीने करा तुळस आणि आवळ्याचा वापर

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, पांढऱ्या केसांना पुन्हा काळं करायचे असेल तर, तुळस आणि आवळ्याचा वापर तुमच्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. तुळशीला बारीक करून वाटून (चेचून) आवळा पावडर बरोबर एकत्र करून घ्या आणि रात्रभर थोड्या पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी अंघोळ करताना या मिश्रनाने केस धुऊन घ्या. केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी काही महिन्यांपर्यंत याचा वापर करत रहा, यामुळे नक्कीच चांगला परीणाम तुम्हाला पाहायला मिळेल.

- Advertisement -

तुळस आणि आवळ्याची पेस्ट 

जर तुमचे सुद्धा केस आता पांढरे होऊ लागले असतील तर , तुळस आणि आवळ्याच्या पानांना एकत्र करून वाटून (चेचून) घ्या. त्यानंतर या मिश्रनाला एक कप पाण्यामध्ये एकत्र करून केसांच्या मुळाला लावून घ्या आणि सुकल्यानंतर केसांना धुवून घ्या. या उपायाने लवकरंचं तुमचे केस काळे होतील.

केसांना चकमदार ठेवण्यासाठी आवळ्याचा उपाय

केसांना चमकदार करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता. केसांमध्ये चमक आणण्यासाठी आवळ्याच्या रसाने मसाज करा. त्यानंतर एका तासाने केसांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. या उपायामुळे केसांमध्ये नैसर्गिक चमक येईल.


हेही वाचा : डायबिटीजमध्ये काजू खाण्याचे चमत्कारी फायदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -