घरलाईफस्टाईलझटपट बेसन बर्फी

झटपट बेसन बर्फी

Subscribe

गोडधोड अशी झटपट बेसन बर्फी

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे घरी फार वेळ असतो. मात्र, अशावेळी काय करावे? वेळ कसा घालवावा? काही कळत नाही. त्यात काहींना काही खावेसे देखील वाटते. अशावेळी तुम्ही गोडधोड अशी झटपट बेसनची बर्फी नक्की करु शकता. चला तर पाहुया बेसन बर्फीची रेसिपी

साहित्य

- Advertisement -

एक कप बेसन
अर्धा कप तूप किंवा डालडा
अर्धा कप साखर
२ ते ३ चमचे रवा

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम रवा आणि बेसन चांगले भाजून घ्या. त्यांचा रंग छान लालसर येईपर्यंत परतून त्या. त्यानंतर त्यात तूप घालून एकजीव करुन पुन्हा बेसन परता. त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यात अर्धा कप साखर आणि त्याच्या अर्धे पाणी घालून पाक तयार करा. पाक चांगला तयार झाल्यानंतर त्या सारणात पाक ओतून एकजवी करा. हे गरमगरम सारण तूप लावलेल्या ताटात चांगले थापून घ्या आणि नंतर आपल्याला हव्या आकारात त्याचे काप काढा. अशाप्रकारे झटपट घरच्या घरी बेसन बर्फी तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -