आज असे एकही क्षेत्र नाही जिथे महिला वर्चस्व गाजवत नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अगदी अतंराळ असो की नेव्हीतील काम असूदेत महिला सर्व क्षेत्रात आपले नाव सिद्ध करत आहेत. पण, अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यापासून महिला अनभिज्ञ आहेत. त्यातील एक क्षेत्र सेल्सचे आहे. सेल्सचे क्षेत्र म्हटल्यावर आपसुकच डोळ्यांसमोर पुरुषमंडळी उभे राहतात. जवळपास गेल्या कित्येक वर्षांपासून सेल्स या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व आहे. पण, बदलत्या काळानुसार आता महिला देखील सेल्स क्षेत्रात आपले करिअर घडवत आहेत. आज आम्ही तुम्हाला सेल्स क्षेत्रात महिलांसाठी करिअरच्या कोणत्या उत्तम संधा आहेत, हे सांगणार आहोत.
पब्लिक रिलेशन –
सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात ग्राहक, मीडिया आणि जनतेशी सतत संपर्कात राहवे लागते. यासाठी उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. जर तुमचे संवाद कौशल्ये उत्तम असतील तर पब्लिक रिलेशन क्षेत्रात नक्कीच काम करू शकता. यासाठी बारावीनंतर किंवा डिग्रीनंतर पब्लिक रिलेशन किंवा पीआर आणि एडव्हरटायइज मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स करावा लागेल. आजकाल प्रायव्हेट आणि सरकारी अशा दोन्ही कंपन्यांमध्ये पीआरची गरज असते. त्यामुळे महिलांसाठी करिअर करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
कॉपीराइटर –
कॉपीराइटिंग क्षेत्रात जाहीराती तुम्हाला लिहाव्या लागतील. तुम्ही भरघोस पगाराची नोकरी करायची असेल तर हे क्षेत्र महिलांसाठी उत्तम असेल. कॉपीराइटिंग क्षेत्राची निवड केल्याने तुम्हाला हव्या त्या वेळेत काम करण्याची संधी मिळते. यामुळे तुम्ही कुटूंबाला वेळ देता येतो आणि करिअर घडवता येते.
एसइओ स्पेशालिस्ट –
एसइओ स्पेशालिस्ट हे क्षेत्र महिलांना करिअर घडवण्यासाठी उत्तम आहे. यात कामात क्लायंट आणि कंपनीच्या वेबसाइट्ससाठी साइट ट्रॅफिक आणि महसूल वाढवण्यासाठी एसइओ तंत्राचे विश्लेषण, पुनरावलोकन आणि नंतर अंमलबजावणी करण्याचे काम पाहिले जाते.
इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मॅनेजर –
हल्ली उत्पादने आणि ब्रॅंडचा प्रचार करण्यासाठी इन्फ्लुएन्सरची मदत घेण्यात येते. कारण त्यांचे सोशल नेटवर्किंग उत्तम असते. अशापरिस्थितीत, लाखो लोकांपर्यत पोहोचण्यासाठी इन्फ्लुएन्सर चांगले दुवा मानले जातात. त्यामुळे महिलांनासाठी करिअर घडवण्यासाठी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मॅनेजर हा उत्तम पर्याय आहे.
डिजिटल मार्केटिंग –
हल्ली डिजिटल मार्केटिंगचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांना करिअर करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग उत्तम पर्याय आहे.
मार्केट रिर्सचर –
सेल्समध्ये मार्केट रिर्सचर हा एक पर्याय उपलब्ध आहे. हल्ली बऱ्याच महिला या क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवत आहेत. तुम्हाला रिसर्चची आवड असेल तर हा पर्याय उत्तम आहे.
हेही पाहा –