Sunday, March 16, 2025
HomeमानिनीDiploma Courses:भरघोस पगार देणारे 12वीचे नंतरचे बेस्ट कोर्सेस

Diploma Courses:भरघोस पगार देणारे 12वीचे नंतरचे बेस्ट कोर्सेस

Subscribe

आपल्या पाल्याने उत्तम शिक्षण घेऊन सेटल व्हावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. यासाठी पालक मुल 10- 12 वी ला जाताच त्यांच्यासाठी करिअरचे असंख्य ऑपन्श शोधू लागतात. हल्ली स्पर्धा इतकी वाढली आहे की, 12 वी नंतर काहीजण जॉब करुन शिक्षण घेतात तर काही 12 वी नंतर एखादा कोर्स करून नोकरी करण्यास सुरवात करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 12 वी नंतर लवकर नोकरी मिळवून देणारे काही कोर्स सांगणार आहोत, जे आजच्या काळाची गरज असाल असल्याने मार्केटमध्ये नक्कीच तुमची डिमांड वाढू शकेल. चला तर मग जाणून घेऊयात, भरघोस पगार देणारे 12वी नंतरचे बेस्ट कोर्सेस,

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence)

बदलत्या काळानुसार, आजकाल सर्वत्र एआयचे ज्ञान असणाऱ्या लोकांची मागणी वाढत आहे. त्यामुळे 12 वी नंतर तुमच्यासाठी करिअर बनवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस चा कोर्स करणे बेस्ट राहिल.

सायबर सिक्युरीटी (Cyber Security)

तुम्हाला जर तंत्रज्ञान शिकायची आवड असेल तर तुम्ही सायबर सेक्युरिटी कोर्स कारायला हवा. सध्या खासगी आणि सरकारी अशा दोन्ही कंपन्यामध्ये सायबर सुरक्षेची मागणी असते. त्यामुळे 12 वी नंतर हा कोर्स करणे फायद्याचे ठरेल. यात तुम्हाला डाटा कलेक्शन एंड प्रोसेसिंग, स्कियोरिटी स्ट्रैटजीज, ऑपरेशनल सेफ्टी मैनेजमेंट, रोल ऑफ मिडलमेन, सिक्योरिट इकोनॉमिंक्स एंड पॉलिसी, सायबर लॉ, क्रिप्टोग्राफी, नेटवर्किंग, फायरवॉल संबधित शिकविले जाते.

इंटीरियर डिजाइनर (Interior Designing)

कमी वेळात तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी करायची असेल तर हा कोर्स निवडावा, कारण 6 ते 1 वर्षाच्या आत शिकता येतो. कोर्स केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा असल्यास तुम्ही इंटेरियर डिझाइनिंगचा कोर्स करायला हवा,

डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)

तुम्हाला इंटरनेट, सोशल मीडिया, मार्केटिंग यात रस असेल तर तुम्ही 12 वी नंतर डिजिटल मार्केटिंग चा कोर्स नक्कीच करु शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही SEO एक्सपर्ट, सोशल मीडिया मैनेजर, कंटेंट मार्केटर, PPC एक्सपर्ट नक्कीच बनू शकता.

VFX आणि अॅनिमेशन ( VFX And Animation)

Animation,3D technology, graphics आजकाल काळाची गरज झाली आहे. अॅनिमेशन शिकलेल्या व्यक्तीला चित्रपटसृष्टीत जास्त मागणी असते आणि पगारही भरघोस असतो. त्यामुळे 12 वी नंतर तुम्ही नक्कीच हा कोर्स करू शकता.

फॅशन डिझाइन कोर्स ( Fashion Designer)

फॅशन डिझाइन कोर्समध्ये शिवणकाम, फॅब्रिक निवड, तंत्रज्ञान, मॉडेल ड्रॉइंग, डिझाइन सारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते.

 

 

 

हेही वाचा –

Manini