Saturday, March 15, 2025
HomeमानिनीHealthWeight Loss : वेट लॉसमध्ये डिटॉक्स वॉटर फायदेमंद

Weight Loss : वेट लॉसमध्ये डिटॉक्स वॉटर फायदेमंद

Subscribe

खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली यांची वेट लॉसच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा तुम्ही वेट लॉसच्या प्रयत्नात असता तेव्हा आहार, कॅलरीजची संख्या आणि पोषण याची काळजी घेणे आवश्यक असते. वेट लॉस करण्यासाठी डाएटिशीयनकडून विविध डाएट प्लॅन घेऊन ते फॉलो केले जातात. काही वेळा याचा परिणाम चांगला येतो तर काही वेळा याचे उलट परिणाम दिसतात. अशावेळी आहारतज्ञांनी सांगितलेला नियम आपण लक्षात घ्यायला हवा. वेट लॉस करताना आहारतज्ञांच्या मते, काही डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करावा असे सांगितले जाते. डिटॉक्स ड्रिंक्समुळे वजन लवकर कमी होते. जाणून घेऊयात, डिटॉक्स ड्रिंक्समुळे वजन कमी होण्यास कशी मदत मिळते.

डिटॉक्स ड्रिंक आहे फायदेशीर – 

वजन वाढीला शरीरातील जळजळ कारण असू शकते. शरीरातील जळजळीमुळे शरीर सुजलेले दिसते. अशावेळी तुम्ही डिटॉक्स ड्रिंक्स प्यायला हवे. खरं तर, डिटॉक्स ड्रिंक्समधील लिंबू, आले, दालचिनी आणि हळद यासारख्या गोष्टींमुळे शरीरातील जळजळ कमी होते.

वॉटर रिटेशनमुळे शरीरात सुज येते. खरं तर, वॉटर रिटेशन अशी परिस्थिती असते, जिथे पाणी शरीराच्या बाहेर पडत नाही. अशावेळी जेव्हा तुम्ही डिटॉक्स ड्रिंक पिता तेव्हा शरीरातील जळजळ कमी होते आणि हळूहळू शरीरातील साठलेले पाणी निघून जाते.

वेट लॉस करताना कॅलरीजच्या सेवनाकडे अवश्य लक्ष द्यावे. कारण जर तुमच्या आहारातून जास्त प्रमाणात कॅलरीज शरीरात जात असतील तर वेट लॉस होणार नाही. अशावेळी आहारात डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करावा. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि वारंवार भूक लागत नाही.

वेट लॉस करताना सर्वात कठीण क्रेविंगवर कंट्रोल करणे असते. अशावेळी क्रेविंग कंट्रोल करण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक्सचा पर्याय उत्तम असतो.

 

 

 

हेही पाहा –

Manini