Thursday, March 27, 2025
HomeमानिनीHealth Tips : वेट लॉससाठी बेस्ट ड्रिंक्स

Health Tips : वेट लॉससाठी बेस्ट ड्रिंक्स

Subscribe

वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम महत्त्वाचे नसून, तुम्ही घेत असलेल्या द्रव पदार्थांचाही मोठा प्रभाव असतो. काही नैसर्गिक आणि हेल्दी ड्रिंक्स मेटाबोलिसम वाढवते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत करतात. आज आपण काही बेस्ट ड्रिंक्स बदल जाणून घेऊयात जे वेट लॉस करायला मदत करतील.

 लिंबूपाणी

सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतो. शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी लिंबूपाणी प्यायले जाते.लिंबूपाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि शरीरातील चयापचय वाढायला मदत करते.

आल्याचा चहा

आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे आल्याचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच पचन सुधारते आणि फॅट बर्निंगला मदत होते. सूज आणि अपचन कमी करायला मदत करते.आल्याचे तुकडे गरम पाण्यात टाकून उकळवून घ्यावे आणि नंतर गाळून घ्यावे. या चहात लिंबाचा रस आणि मध टाकून प्यावा.

ग्रीन टी

अँटीऑक्सिडंट्सने भरलेला आणि फॅट बर्निंगला मदत करणारा. रोज 2-3 कप प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.

कोथिंबिरीचा रस

वजन कमी करण्यासाठी कोथिंबिरीचा रस प्यायला जातो. कोथिंबिरीच्या पानांमध्ये कॅलरी कमी असते आणि फायबर जास्त असते, त्यामुळे भूक कमी होते. कोथिंबिरीच्या रसाचे इतरही काही फायदे आहेत.

कडुलिंबाचे पाणी

चरबी कमी करण्यात मदत होते. रक्तशुद्धीकरणासाठी फायदेशीर.कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने शरीरात होणारे संसर्ग दूर होतात.

हेही वाचा : Health Tips : मासिक पाळीच्या वेळी पेनकिलर्स घेताय ?


Edited By : Prachi Manjrekar

Manini