Friday, March 28, 2025
HomeमानिनीHealthSummer Health : उन्हाळ्यात खावीत ही आरोग्यदायी फळे

Summer Health : उन्हाळ्यात खावीत ही आरोग्यदायी फळे

Subscribe

उन्हाळा सुरू झाला की, अंगाची लाहीलाही होण्यास सुरूवात होते. सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून तीव्र उन्हाचे चटके आताच सुरू झाले आहेत. अशावेळी शरीरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी रस्त्यावरील उघड्या ज्यूसचा किंवा शीतपेयांचा आधार घेण्यात येतो. या पेयांनी तात्पुरता थंडावा शरीरात निर्माण होतो खरा पण या पेयांनी आरोग्यावर होणारा परिणाम कोणीही पाहत नाही. आरोग्यासाठी ही पेये किती सुरक्षित आणि योग्य आहेत? हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्याकडे दुर्लक्ष होते. अशापरिस्थितीत तुम्ही, उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी फळांचे सेवन करायला हवे. फळांतील पोषकतत्वांमुळे शरीर निरोगी तर राहतेच शिवाय व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. चला तर मग जाणून घेऊयात, उन्हाळ्यात कोणती आरोग्यदायी फळे खावीत.

ताडगोळे –

ताडगोळ्यामध्ये आयर्न, लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन्स आदी पोषकतत्वे आढळतात. ताडगोळे थंड असल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर असतात. ताडगोळ्याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी मदत मिळते. कारण यात व्हिटॅमिन सी आढळते. उन्हाळ्यात डिहाड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी ताडगोळे अवश्य खावेत. यातील पाणी शरीराला हायड्रेट तर ठेवतेच शिवाय थंडही ठेवते.

कलिंगड –

कलिंगडामध्ये साधारणपणे 95% पाणी असते. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड खावे असे सांगितले जाते. कलिंगडात विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स, आयर्न आढळतात, जे शरीरासाठी आवश्यक आहेत.

द्राक्ष –

उन्हाळ्यात रसदार द्राक्षे आवर्जुन खावीत. अनेक पोषकतत्वांनी परिपू्र्ण असलेली द्राक्षे खाल्ल्याने तहान भागते आणि भूकही मिटते. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन्स बी, सी आणि के आढळतात.

नारळपाणी –

नारळपाणी शरीरासाठी आवश्यक असते. यात अनेक पोषकतत्वे आढळतात. जसे की, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट आढळतात, जे शरीर हायड्रेट ठेवतात. ज्यामुळे डिहाड्रेशन होत नाही. याशिवाय वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

अननस –

उन्हाळ्यात अननस खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवायचे असल्यास अननस खायला हवा. याशिवाय अननसात असलेले ऍटी-ऑक्सिडंट आणि एन्जाइम्स जळजळ आणि अनेक आजारांपासून शरीराचे संरक्षण करतात. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे थकवा येतो. हा थकवा दूर करून शरीर ऊर्जावान होण्यासाठी अननस खायला हवे.

 

 

 

 

 

हेही पाहा –

Manini