आपले केस मजबूत आणि चांगले राहावे असे सर्वांनाच वाटते. आपण त्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. विविध प्रॉडक्ट्स देखील वापरतो. बऱ्याचदा या प्रॉडक्ट्समुळे आपली केस खराब होतात. त्यामुळे केसांसाठी उत्तम जेल निवडताना आपल्या केसांच्या प्रकारानुसार आणि आवश्यकतेनुसार योग्य पर्याय निवडणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण जाणून घेऊयात केसांसाठी कोणते जेल उत्तम आहे.
हेअर जेल कशासाठी वापरले जाते?
बऱ्याचदा हेअर स्टाइल करताना केसांवर नीट बसण्यासाठी हेअर जेल वापरले जाते. तसेच केस चमकदार आणि सेट करण्यासाठी फ्रिजी न होण्यासाठी हेअर जेलचा वापर केला जातो.
हेअर जेल निवडताना कोणते घटक लक्षात घ्यावेत?
हेअर जेल निवडताना केसांचा प्रकार म्हणजे केस कोरडे किंवा नॉर्मल कर्ली केसांसाठी वेगवेगळे जेल उपलब्ध असतात. त्यामुळे तुमच्या केसांच्या प्रकारानुसार तुम्ही या जेलची निवड करू शकता.
जेलची निवड कशी करावी
कोरडे किंवा निस्तेज
कोरडे किंवा निस्तेज केसांसाठी अल्कोहोल-मुक्त जेल वापरणे चांगले आहे. हे तेल केसांना मॉइश्चरायइज करायला मदत करते.
गळणारे किंवा कमकुवत केस
जर तुमचे केस वारंवार गळत असतील किंवा खराब झाली असतील तर तुम्ही नैसर्गिक घटक असलेले जेल वापरू शकता.
तेलकट केस
जर तुमची केस तेलकट असतील तर फॉर्म्युलाचे जेल वापरणे योग्य ठरेल.
कर्ली केस
हायड्रेटिंग आणि मजबूत होल्ड असलेले जेल चांगले.
हे तेल घरी कसे बनवायचे
अल्व्हा आणि अंजीर जेल
अल्व्हा आणि अंजीरच्या मिश्रणाचे जेल केसांसाठी एक उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे. याचे कंडिशनिंग गुण केसांना मऊ आणि लांब ठेवण्यास मदत करतात.
आलं आणि शहाळ्याचे जेल
आलं आणि शहाळ्याचे जेलने केसांच्या मुळांमध्ये रक्तप्रवाह सुधारते आणि शहाळ्याचे जेल केसांना पोषण देतात. यामुळे केस जाड आणि मजबूत होतात.
कोकोनट जेल
नारळाच्या तेलाचा जेल केसांना मुलायम आणि चमकदार बनवते.
मेथी आणि दही जेल
मेथीचे पाणी आणि दह्याचे जेल केसांना सौम्यपणे पोषण देतात आणि केसांचा नैसर्गिक गुळगुळीतपणा राखतात.
हेही वाचा : Frizzy Hair Remedies : होममेड हेअर पॅकने फ्रिझी केस होतील सॉफ्ट
Edited By : Prachi Manjrekar