Wednesday, February 12, 2025
HomeमानिनीBeautyHair Growth Oil : केसांच्या वाढीसाठी उपयुक्त तेल

Hair Growth Oil : केसांच्या वाढीसाठी उपयुक्त तेल

Subscribe

सौंदर्यात भर घालण्यासाठी केस महत्त्वाची भूमिका बजावतात. दाट, चमकदार आणि मजबूत केसांमुळे व्यक्ती आणखीनच सुंदर दिसते. त्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी विविध हेअर प्रॉडक्टसचा वापर करण्यात येतो. कधी कधी केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्टमुळे केसांवर दुष्परिणाम होतात. त्यात प्रदुषित हवा, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली यामुळे केसांच्या तक्रारी वाढत असून केसांची वाढ न होणे ही समस्या प्रामुख्याने जाणवत आहेत. अशावेळी केसांची खुटंलेली वाढ सुरू करण्यासाठी तुम्ही विविध तेलांचा वापर करू शकता.

खोबरेल तेल –

केसांच्या वाढीसाठी अगदी पिढ्यानपिढ्या वापरले जाणारे तेल म्हणजे खोबरेल तेल. याच्या नियमित वापराने केस लांब, काळे आणि दाट होतात. केसगळती रोखण्यासाठी खोबरेल तेलाने आठवड्यातून किमान 2 वेळा मालिश करावी. खोबरेल तेलामुळे केसातील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो आणि खराब होण्यापासून वाचतात.

कांद्याचे तेल –

कांद्याच्या तेलात असलेले ऍटी-ऑक्सिडंट आणि सल्फर केस गळती रोखून त्यांना खोलवर पोषण देतात.

एरंडेल तेल –

केस मजबूत आणि दाट करायचे असल्यास एरंडेल तेलाचा वापर केसांसाठी करायला हवा. एरंडेल तेलाने टाळूवर मालिश केल्याने केसांची वाढ होण्यास मदत मिळते. तुम्ही आठवड्यातून एकदा या तेलाने केसांना मालिश करू शकता.

कडीपत्याचे तेल –

कडीपत्याच्या तेलामध्ये व्हिटॅमिन बी आढळते. व्हिटॅमिन बी मुळे केस मजबूत आणि चमकदार होतात. तुम्ही खोबरेल किंवा मोहरीच्या तेलामध्ये कडीपत्याचे तेल मिक्स करुन केसांना लावू शकता. केस नैसर्गिकपद्धतीने मजबूत आणि वाढ होण्यासाठी कडीपत्याचे तेल फायदेशीर असते.

ऑलिव्ह तेल –

ऑलिव्ह तेल केसांच्या विविध तक्रारी कमी करण्यासाठी फायदेशीर असते. ऑलिव्ही ऑइलच्या वापरामुळे केसगळती रोखून केस अधिक मजबूत आणि चमकदार होतात.

बदाम तेल –

बदाम तेल केसांसाठी फायदेशीर असते. सूर्याच्या किरणांपासून संरक्षण ते केसांच्या तक्रारी कमी करुन केसांची वाढ होण्यासाठी नियमित बदाम तेल केसांसाठी वापरायला हवे.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini