आपल्यापैंकी अनेक जणांना रात्रीची झोप लवकर येत नाही. यामागे बदलती लाइफस्टाइल, खाण्यापिण्याची सवय यासह अनेक कारणे असू शकतात. निरोगी शरीरासाठी किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक असते. रात्रीची अपूर्ण झोप विविध आजारांचे कारण बनू शकते. अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी, चिडचिड होणे, लक्ष्य विचलित होणे असे समस्या सुरू होतात. अशावेळी रात्रीची शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी संतूलित आहार उपयुक्त ठरू शकतो. जाणून घेऊयात, शांत झोपेसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.
- आपण लहानपणापासूनच असे ऐकत आलो आहोत की, शांत झोपेसाठी भात खायला हवा. तुम्ही पांढऱ्या तांदळाचा आहारात समावेश करू शकता. तांदूळ हा ग्लाइसेमिक इंडेक्स फूड मानले जाते. तज्ञांच्या मते, उच्च ग्लाइसेमिक इंडेक्सयुक्त अन्न खाल्लास चांगली झोप येते. त्यामुळे रात्रीच्या आहारात भाताचा समावेश अवश्य करावा.
- रात्रीची शांत झोप लागण्यासाठी कोमट दूध पिणे फायदेशीर ठरेल. कोमट दुधाच्या सेवनाने शरीराला आराम मिळतो आणि अस्वस्थता दूर होते. ज्यामुळे शांत झोप लागते.
- रात्रीची शांत आणि गाढ झोप येण्यासाठी अक्रोडचास आहारात समावेश करावा. अक्रोडमध्ये फॅटी ऍसिड आढळतात. यामुळे शांत झोप येण्यास मदत होते.
- बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम आढळते. ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते आणि मसल्सवरील ताण कमी होतो.
- रात्री झोप लागत नसेल तर डार्क चॉकलेट खावेत. डार्क चॉकलेटमध्ये सेरोटोनिन नावाचे घटक आढळतात. ज्यामुळे तुमचा मेंदू शांत होतो आणि झोपेचे बिघडलेले चक्र सुरळीत होते.
- किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम आढळते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. तुम्हाला जर निद्रानाशेची समस्या असेल तर झोपण्यापूर्वी 1 ते 2 किवी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
हेही पाहा –