पाळीव प्राणी आपल्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे आपण त्यांना आपल्या घरातील सदस्यांपैकी एक समजतो.त्यामुळे त्यांच्यासाठी घरात एक सुरक्षित, आरामदायक आणि अनुकूल जागा असणे गरजेचे आहे. हल्ली इंटिरियर डिझाइनमध्ये सुद्धा अनेक बदल झाले आहेत. तुम्ही तुमच्या या खास सदस्यासाठी सुंदर डिझाइन्स विकसित करू शकता. ज्यामुळे त्यांचे आरोग्य खेळण्याची जागा आणि संपूर्ण जीवनशैली अधिक आनंददायी होईल. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात पाळीव प्राण्यांसाठी कोणती होम डिझाइन्स बेस्ट आहेत.
पाळीव प्राण्यांसाठी खास कॉर्नर
तुम्ही एक खास कॉर्नर देखील बनवू शकता. त्या कॉर्नरमध्ये त्यांच्या आवडीच्या गोष्टी तसेच जिथे ते आराम करू शकतील अशी जागा.कुत्र्यासाठी सॉफ्ट कुशन किंवा बेड मांजरींसाठी हॅमॉक किंवा उंच प्लॅटफॉर्म
पेट हाऊस
फर्निचरमध्येच पाळीव प्राण्यांसाठी जागा डिझाइन करता येऊ शकते . पलंगाखाली किंवा कपाटाच्या एका भागात छोटं घर तुम्ही तयार करून घेऊ शकतात. टेबलच्या खालचा भाग मांजरीसाठी निवांत कोपरा तयार करू शकता.
पेट-फ्रेंडली फ्लोअरिंग
लाकडी किंवा व्हिनाइल फ्लोअरिंग वापरा, जे स्क्रॅच-प्रूफ असेल. वॉशेबल रग्स ठेवा.
मांजरींसाठी वॉल क्लाइंबिंग स्ट्रक्चर
मांजरींना उंच ठिकाणी चढायला खूप आवडतात. त्या नेहमी इथून तिथून उड्या मारत असतात. त्यामुळे भिंतीवर स्टेप्स किंवा शेल्फ्स लावा.
इनडोअर आणि आउटडोअर स्पेस
जर तुमच्याकडे अंगण असेल, तर सुरक्षित कुंपण करून मांजरी किंवा कुत्र्यांसाठी खेळण्याची जागा तयार करा.
हायजिन आणि स्वच्छता
सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हायजिन आणि स्वच्छता. कुत्र्यासाठी शॉवर एरिया किंवा पेट वॉश स्टेशन डिझाइन करा. स्वतः साफ होणारे लिटर बॉक्स किंवा लपवता येणारे लिटर ट्रे मांजरींसाठी उत्तम आहे.
पेट-फ्रेंडली सोफा आणि बेड
स्क्रॅच-रेसिस्टंट आणि केस न चिकटणारे फॅब्रिक वापरा. रिमूव्हेबल कव्हर असलेले फर्निचर घ्या.
तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांच्या सवयी आणि वागणूक लक्षात घेऊन हे डिझाइन करू शकता आणि यामध्ये बदल करू शकता.
हेही वाचा : Pet Care : उन्हाळ्यात तुमच्या सोन्या, मोती, ब्रुनोची अशी घ्या काळजी
Edited By : Prachi Manjrekar