तुळस –
धार्मिकतेनुसार तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्याच्यादृष्टीने अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारी तुळस महत्त्वाची मानली जाते. तुळस जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते. त्यामुळे वातावरण स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत होते.
स्पायडर प्लांट –
स्पायडर प्लांट हवा शुद्ध करण्यासाठी ओळखले जाते. याशिवाय घरात इनडोअर प्लांटसाठी बेस्ट असते, कारण याच्या वाढीसाठी जास्त सूर्यप्रकाशाची गरज नसते.
लिली –
शुद्ध हवेसाठी तुम्ही घरात लिली लावू शकता. यासह यातील गुणधर्मांमुळे विविध रोगांपासून दूर राहण्यास मदत होते.
बोस्टन फर्न –
बोस्टन फर्न रोप आकर्षक असत. त्यामुळे घराची शोभा वाढवण्यासाठी अनेकजण घरात हे रोप लावतात. लिलीमुळे हवेतील प्रदुषण कमी होण्यास मदत होते.
कोरफड –
सौंदर्य सुधारण्यासाठी कोरफड फायदेशीर असतेच याशिवाय हवा शुद्ध करण्यासाठी याचा उपयोग होतो.
मनी प्लांट –
मनी प्लांट सर्रासपणे कित्येकजणांच्या घरात दिसते. वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट आर्थिक समस्या कमी करते शिवाय हवेतील प्रदुषण कमी होण्यास मदत होते.
स्नेक प्लांट –
स्नेक प्लांट रात्री ऑक्सिजन सोडणारी वनस्पती आहे. त्यामुळे नक्कीच घरात तुम्ही हे लावू शकता.
एरिका पाम –
एरिका पाम हवेतील विषारी पदार्थ शोषून घेण्यास फायदेशीर असते. त्यामुळे शुद्ध हवेसाठी तुम्ही नक्कीच हे झाड लावू शकता.
हेही पाहा –