Thursday, March 20, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : सर्दी पडशावर रामबाण काढा

Health Tips : सर्दी पडशावर रामबाण काढा

Subscribe

उन्हाची झळाळी आता सुरू झाली आहे. वातावरणता बदल झाला असून अनेक वायरल इन्फेक्शनचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वायरल इन्पेक्शनमध्ये सर्दी- खोकला या सामान्य समस्या आहेत. बदलत्या वातावरणात रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि विषाणूजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. परिणामी, घसा खवखवणे, सर्दी, कफ, खोकला, हलका ताप येतो. अशावेळी औषधे घेण्यापूर्वी घरगुती उपाय करू शकता. आयुर्वेदात सर्दी पडशावर अनेक काढे सांगितले आहेत. या काढ्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. चला तर मग जाणून घेऊयात, सर्दी, खोकल्यासाठी प्रभावी काढे कोणते आहेत

काढा तयार करण्यासाठी साहित्य –

  1. तुळशीची पाने – 7 ते 8
  2. आल्याचा तुकडा
  3. काळी मिरी – 4 ते 5
  4. लवंग – 2 ते 3
  5. दालचिनी तुकडा – 1
  6. हळद पावडर – अर्धा चमचा
  7. लिंबाचा रस – 1 चमचा
  8. पाणी – दीड ते 2 कप

कृती –

  1. सर्वात आधी एका पातेल्यात 2 कप पाणी घ्यावे आणि मंद आचेवर गरम करावे.
  2. पाण्यात तुळशीचा पाने, आले, काळी मिरी, लवंग, दालचिनी घालावी.
  3. आता पुन्हा मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे उकळवून घ्यावे.
  4. 2 ते 3 मिनिटे उकळल्यावर हळद पावडर, गूळ घालावी.
  5. पाणी अर्धापर्यत आल्यावर गॅस बंद करावा.
  6. गॅस बंद करून पाणी गाळून घ्यावे.
  7. सर्वात शेवटी लिंबाचा रस टाकावा आणि काढा कोमट करून प्यावा.

काढा काम कसे करतो ?

काढ्यातील ऍटी-बॅक्टेरियल आणि ऍटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे घसा खवखवणे आणि सर्दीपासून आराम देताता. आल्यामध्ये असलेले ऍटी-बॅंक्टेरियल गुणधर्म घशाची जळजळ कमी करते. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन घटक संसर्गाशी लढते.मध किंवा गूळ काढ्याला चव देते.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini