होळीचा सण येण्याआधीच, विविध ठिकाणी होळीच्या पार्ट्यांचे आयोजन सुरू होते. अशा परिस्थितीत, होळीसारखा फंकी लूक मिळविण्यासाठी, मेकअप आणि चांगले कपडे घालण्यासह तुम्ही हातांची नखे देखील सजवू शकता. या नेलं आर्टमुळे तुम्हाला ट्रेंडी लूक मिळेल. आज आपण या लेखातून काही स्टायलिश आणि ट्रेंडी नेलं आर्ट डिझाइन्स जाणून घेऊयात.
मोनोक्रोम नेल आर्ट
हल्ली मोनोक्रोम नेल आर्ट खूप ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्हाला सिंगल कलर लूक आवडत असेल तर मोनोक्रोम नेल आर्ट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. यामुळे तुमचे हात ट्रेंडी आणि सुंदर दिसतील. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या नेलं आर्टची निवड करू शकता. जसे गुलाबी, लाल, निळा किंवा जांभळा निवडू शकता. हे रंग होळीच्या थिमसाठी बेस्ट आहेत.
रेम्बो नेलं आर्ट
होळी हा रंगाचा सण असतो . जर तुम्हाला तुमची नखे आकर्षक आणि सुंदर पाहिजे असेल तर तुम्ही रेम्बो नेलं आर्ट करू शकता. रेम्बो नेलं आर्ट खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल. तुम्ही प्रत्येक नखांवर वेगवेगळे रंग वापरू शकता. हे नेलं आर्ट तुमच्या होळी पार्टीसाठी उत्तम आहे.
चेक्स नेल आर्ट
जर तुम्हाला क्लासिक आणि ट्रेंडी लूक पाहिजे असेल तर तुम्ही चेक्स नेल आर्ट करू शकता. हा बेस्ट ऑप्शन आहे. हे चेक्स नेल आर्ट खूप युनिक आणि सुंदर आहे. हे नेल आर्ट तुम्ही मल्टीपल कलर्समध्ये निवडू शकता.
मिसमॅच नेल आर्ट
काही हटके आणि युनिक लूकसाठी मिसमॅच नेल आर्ट खूप लोकप्रिय आहे. यामध्ये, प्रत्येक कोपऱ्यात डिझाइन आणि रंग वापरले जातात. या प्रकारचे नखे तुम्हाला एक स्टायलिश आणि बोल्ड लूक देतील. होळी पार्टीसाठी हा एक परिपूर्ण पर्याय आहे . यामध्ये तुम्ही चमकदार आणि पेस्टल शेड्स वापरू शकता.
हेही वाचा : Fashion Tips : पार्टीला स्टाइल करा जन्नत जुबेरचे बेस्ट ड्रेसेस
Edited By : Prachi Manjrekar