ग्लोइंग आणि सॉफ्ट स्किनसाठी आपण बरेच जण अनेक प्रयत्न करत असतो. तेल आपल्या केसांसाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. तेल आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवायला आणि पोषण देण्यास मदत करते. योग्य तेलाची निवड केल्यास तुमची त्वचा तजेलदार, मऊ आणि निरोगी दिसू शकते. आज आपण जाणून घेऊयात ग्लोइंग आणि सॉफ्ट स्किनसाठी कोणती तेल उत्तम आहेत.
नारळ तेल
नारळाच तेल मॉइश्चरायझिंगसाठी उत्तम आहे.हे कोरड्या त्वचेला नरम आणि चमकदार बनवते.रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही नारळाच्या तेलाने त्वचेला मालिश करू शकता.
बदाम तेल
त्वचेला पोषण देण्यासाठी आणि ग्लोइंग बनवण्यासाठी बदामाचे तेल आहे उत्तम. बदाम तेल त्वचेला हायड्रेट आणि अँटी-एजिंग करायला मदत करते. तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे देखील कमी होतात.
ऑलिव्ह तेल
त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा टिकवून ठेवतात. ऍन्टीऑक्सिडंट्सने भरलेले असल्याने त्वचेचं आरोग्य देखील सुधारते .
गुलाबाचं तेल
गुलाबाचं तेल त्वचेला चमकदार बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.सुरकुत्या आणि डाग कमी करण्यासाठी देखील खूप उपयोगी आहे.
आर्गन तेल
आर्गन तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. आर्गन तेल हे आर्गन झाडापासून मिळते आणि त्यामध्ये व्हिटॅमिन ई, फॅटी ऍसिड, स्क्वॅलिन आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे हे तेल त्वचेला हायड्रेट ठेवायला मदत करते .चेहऱ्यावरील तेलकटपणा देखील कमी करता येतो.
त्वचेसाठी सर्वोत्तम मानली जाणारी काही तेलं म्हणजे नारळ तेल, बदाम तेल, अर्गन तेल, आणि रोजहिप तेल. योग्य प्रकारे या तेलाचा वापर केल्याने तुम्हाला सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळेल.
हेही वाचा : Frizzy Hair Remedies : होममेड हेअर पॅकने फ्रिझी केस होतील सॉफ्ट
Edited By : Prachi Manjrekar