सध्याच्या धावपळीच्या जीवनात थोडा वेळ जरी मिळाला तरी लोक कुठे ना कुठे जाण्याचा प्लॅन करतात. त्यात जर मित्रांसोबत जाण्याचा प्लॅन असेल तर प्रश्नच नाही कारण मित्रांसोबत ट्रिप हा वेगळा अनुभव असतो. मार्च महिना सुरु होतोय. मार्च हा असा महिना आहे जेव्हा देशाच्या अनेक भागात सौम्य उष्णता सुरु होते. अशा परिस्थितीत मार्चमध्ये प्रवास करण्याची एक वेगळीच मज्जा असते. तुम्ही सुद्धा मार्चमध्ये मित्रांसोबत आउटिंगचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.
ऋषिकेश –
योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेले ऋषिकेश हे उत्तराखंडचे एक भव्य आणि सुंदर हिलस्टेशन आहे. इथे तुम्ही मित्रांसोबत फिरण्याचा प्लॅन करू शकता. येथे एकदा तरी जाऊन यायचे असे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते. उंच पर्वत, तलाव, धबधबे, घनदाट जंगले आणि गंगा नदी ऋषिकेशच्या सौंदर्यात भर घालते. येथे तुम्ही पर्वतांमध्ये असलेल्या मित्रांसोबत कॅम्प हाऊसमध्ये मज्जा करू शकता. याशिवाय येथे तुम्ही हायकिंग, बंजी जंपिंग आणि रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.
गोवा –
गोवा हे देशातील असे ठिकाण आहे जेथे अनेकजण मित्रांसोबत जाण्याचा प्लॅन करतात. गोवा सोनेरी समुद्रकिनाऱ्यासाठी जगप्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला नाईटलाईफचा वेगळाच आनंद मिळतो. याशिवाय गोव्यात तुम्ही अनेक वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता. गोव्यातील दूधसागर फॉल्स, अंजुना बीच, वागेटोर बीच यासारखी उत्तम ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
जैसलमेर –
पाकिस्तान सीमेजवळ असलेले जैसलमेर हे राजस्थानचे प्रमुख आणि लोकप्रिय स्थळ आहे. थारच्या वाळवंटातील वाळूच्या भव्य ढिगाऱ्यामुळे या सुंदर शहराला ‘गोल्डन सिटी’ असे म्हणतात. येथे तुम्ही डेझर्ट सफारीचा आनंद घेऊ शकता. याशिवाय तुम्ही उंटावरही सवारी करू शकता. याशिवाय येथे तुम्ही जैसलमेर किल्ला, गडीसार तलाव आणि ‘पटावो की हवेली’ ही सुंदर ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळतील.
हंपी –
युनिस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये असलेले हंपी मित्रांसोबत आउटिंगसाठी उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही विरुपाक्ष मंदिर, राणीचे स्नान, मातंग हिल, लोटस मंदिर यासारखी उत्तम ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
महाबळेश्वर –
महाबळेश्वर हे एक हिलस्टेशन असून येथील हवामान कायमच अल्लाहदायक असते. मार्च महिन्यात तुम्ही येथे जाऊ शकता. येथे तुम्हाला मित्रांसोबत चिल करता येईल. येथे तुम्हाला स्ट्रॉबेरी पिंकिंग, बोटिंग, साईटसिंग अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल.
हेही वाचा : आउटिंगसाठी फ्रेश हवेच्या ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या