8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिला आपल्या फॅमिलीसाठी सदैव उभ्या असतात. दिवसाची सुरूवात त्यांची काट्यावर सुरू होते. अशा परिस्थितीत महिला स्वत:ला वेळ द्यायला विसरतात. त्यामुळे वुमन्स डे च्या निमित्ताने मैत्रींणीसोबत घरच्या कामातून ब्रेक घेत स्वत:साठी नक्कीच वेळ काढू शकता आणि मुंबई फिरू शकता. मुंबईत फिरण्यासाठी अशी बरीच ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही यंदाचा वुमन्स डे स्पेशल करू शकता.
सिद्धिविनायक मंदिर –
वुमन्स डे ची सुरूवात बाप्पाच्या आशिर्वादाने करायची असल्यास तुम्ही दादरमधील सिद्धीविनायकाच्या मंदिरात जाऊ शकता. दादरमधील सिद्धिविनायक मंदिर हेस मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे.
गेटवे वे ऑफ इंडिया –
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे कायमचं आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. याला मुंबईचं हार्ट असे देखील म्हटले जाते. ही इमारत इंडो-सारासेनिक स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले आहे.
मरिन ड्राईव्ह –
वुमन्स डे च्या दिवशी मुंबईत फिरण्यासाठी दुसरं बेस्ट ठिकाण मरीन ड्राइव्ह आहे. येथे तुम्हाला सूर्यास्त पाहता येईल.
जुहू बीच –
जुहू बीच मुंबईतील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. येथे तुम्हाला गर्ल्स गॅगसोबत स्टॉल्सवर वडापाव, पाणीपुरी, भेळपुरीचा आनंद घेता येईल.
एलिफंटा लेणी –
एलिफंटा लेणी ही अरबी समुद्रातील एका बेटावर असलेल्या लेण्यांचा समूह आहे. येथे तुम्हाला बोटीने जावे लागेल. वन डे रिटर्न साठी हे ठिकाण बेस्ट आहे.
मुंबईत अजून्ही बरीच ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही तुमच्या गर्ल गॅगसोबत नक्की जाऊ शकात. तुम्हाला मुंबईतील संग्रहालये, उद्याने, बाजारपेठा किंवा रेस्टॉरंट्सला भेट देऊ शकता.
हेही पाहा –