Sunday, March 16, 2025
HomeमानिनीHome Decor : या झाडांच्या मदतीने घराला द्या सुंदर लुक

Home Decor : या झाडांच्या मदतीने घराला द्या सुंदर लुक

Subscribe

होम डेकोर म्हटलं की, फक्त रंग, फर्निचर आणि पडदे या सगळ्याचा विचार केला जातो. पण यामध्ये तुम्ही छोट्या रोपट्यांचा देखील तितकाच विचार करू शकतो. हिरवळ तशी आता घराशेजारी पाहायला मिळत नाही. पण होम डेकोरमध्ये झाडांचा खूप मोठा वाटा आहे. अगदी तुम्ही घरच्या घरी ही छोटी रोपटी लावू शकता आणि घराला अतिशय फ्रेश आणि ताजा लुक देऊ शकता.

कोरफड

अनेक ठिकाणी कोरफडीचे फायदे ऐकले असतीलच. हे एखाद्या जादुई वनस्पतीपेक्षा कमी नाही. आजकाल जवळपास प्रत्येकाच्या घरात हे रोप असते. जर तुमच्याकडे नसेल तर ते तुमच्या घरी आणण्याची वेळ आली आहे.

बांबू

फेंगशुई (चीनी वास्तू) भारतात लोकप्रिय झाल्यापासून बांबूची मागणीही खूप वाढली आहे. फेंगशुईनुसार घरात बांबूचे रोप ठेवणे शुभ लक्षण आहे. तुम्हाला जवळपास प्रत्येक घरात बांबूचे रोप मिळेल. ते अगदी कमी पाण्यातही झपाट्याने वाढते आणि बराच काळ टिकते.

मनी प्लांट

दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये चिनी मनी प्लांट अतिशय सामान्य आणि लोकप्रिय आहे.त्याची देखभाल करणे देखील खूप सोपे आहे. यासोबतच घरातील हवा शुद्ध करण्यासाठी ही अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली वनस्पती मानली जाते.

​पिस लिली

होम डेकोरमध्ये सर्वात लोकप्रिय इनडोअर प्लांट आहे पिस लिली. हे लिली प्रकारातले अरूम कुटुंबातील उष्णकटिबंधीय सदाहरित वनस्पती आहे. वास्तू टिप्सनुसार या रोपट्यामुळे घरात आनंद आणि उत्साह कायम राहतो. महत्वाचं म्हणजे हे रोपटं बेडरूममध्ये ठेवावं.

​स्नेक प्लांट

अनेकदा होम डेकोरमध्ये स्नेक प्लांटचा वापर केला जातो. कारण हे दिसायला अतिशय लोभस आणि नाजूक रोपटं आहे. यामुळे घरातील नकारात्मक वाईब्स निघून जातात. तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. या रोपट्यामुळे आतील हवा खेळती राहण्यास मदत होते.


Edited By : Nikita Shinde

Manini