आता काही दिवसांनी 31 स्ट येणार आहे. सगळीकडे आपल्याला 31 स्ट ची जोरदार तयारी पाहायला मिळते. 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे तो मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सगळीकडे पार्टीचे खास आयोजन केले जाते. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांची तयारी केली जाते. बरेच लोक या दिवशी आपल्या कुटूंब किंवा मित्रांसह कुठे तरी बाहेर फिरायला जातात. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही कोणत्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. आज आपण 31 स्ट सेलिब्रेशनसाठी काही बेस्ट स्पॉट बद्दल जाणून घेऊयात.
मुंबई
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी, सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे मुंबई. जर तुम्हाला मुंबई खूप सुंदर आणि आकर्षक बघायची असेल तर तुम्ही या दिवसात मुंबईला जाऊ शकता. यावेळी संपूर्ण शहर नववर्षाच्या जल्लोषात मग्न असते. एक वेगळाच उत्साह आपल्याला सर्वांमध्ये पाहायला मिळतो.
तसेच तुम्ही मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह किंवा इतर ठिकाणी जाऊन देखील भेट देऊ शकता .
हिमाचल प्रदेश
थंडीच्या दिवसात हिमाचल प्रदेशला जायची मज्जा काही वेगळीच असते. हिमाचल येथे असलेल्या मैक्लोडगंज हे ठिकाण उत्तम आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही येथील एका अप्रतिम कॅफेमध्ये जाऊन येथील निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेऊ शकता. तसेच तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बौद्ध मंदिरे आणि मठ या ठिकाणी भेट देऊ शकता. येथे गेल्यावर तुम्हाला शांती देखील मिळेल.
राजस्थान
राजस्थानला बघण्यासारखी अशी बरीच ठिकाणे आहेत. जिथे जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. राजस्थानला उदयपूर हे ठिकाण खूप सुंदर आहे. या ठिकाणी पॅलेस पाहायला मिळतील. तसेच शाही पद्धतीचे जेवण स्वादिष्ट पदार्थ. या सर्व गोष्टींचा आनंद तुम्ही उदयपूर घेऊ शकता.
दिल्ली
न्यू इयरला तुम्ही दिल्ली या ठिकाणी जाऊन देखील सेलिब्रेशन करू शकता. दिल्लीत अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे जाऊन तुम्ही न्यू इयरची मज्जा घेऊ शकता. जर तुम्हाला रात्री फिरायचे असेल तर तुम्ही साउथ दिल्लीला देखील जाऊ शकता. साउथ दिल्लीला अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
भीमताल
भीमताल हे उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. भीमतालची सहल नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी उत्तम आहे. जर तुम्हाला निर्सग आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकता. तुम्हाला येथे खाण्यासाठी आणि पिण्यासाठी अनेक चांगले कॅफे आणि रेस्टॉरंट्स देखील मिळतील. जर तुम्हाला पार्टी करायला आवडत नसेल तर शांतता आवडत असेल तर तुम्ही या भागात असलेल्या प्राचीन मंदिरांना आणि प्रसिद्ध संग्रहालयांना भेट देऊ शकता.
हेही वाचा : Mumbai Travel Destination : थंडीत मुंबईच्या या ठिकाणांना भेट द्या
Edited By : Prachi Manjrekar