उन्हाळ्यात योग्य फूटवेअरची निवड करणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही योग्य फूटवेअरची निवड केली नाही तर तुमच्या पायांना इजा होऊ शकते तसेच उन्हामुळे पाय काळे देखील पडू शकतात. त्यामुळे आरामदायक आणि स्टायलिश फूटवेअर घालणे खूप महत्त्वाचे असते. असे फूटवेअर घातल्यामुळे उष्णतेपासून संरक्षण मिळते आणि हे फूटवेअर दिवसभर देखील घालू शकतात. आज आपण जाणून घेऊयात उन्हाळ्यासाठी बेस्ट स्टायलिश फूटवेअरची निवड कशी करावी.
स्लीपर्स आणि फ्लिप-फ्लॉप्स
हे स्लीपर्स खूप हलके आणि कम्फर्टेबल आहेत. बीच किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी परफेक्ट आहे. यामध्ये तुम्हाला वॉटरप्रूफ पर्याय देखील मिळतील.
स्ट्रॅपी सँडल्स
स्ट्रॅपी सँडल्स या खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. एथनिक वेअरसोबत उत्तम मॅच करतील. हे सँडल्स तुम्हाला फ्लॅट आणि हील दोन्ही प्रकारात उपलब्ध मिळतील.
लोफर्स
लोफर्स हे एक फ्लॅट सॅंडल आहे. ही फ्लॅट सॅंडल तुम्ही कुठेही सहजपणे घालू शकता. कोणत्याही आउटफिटसह ट्राय करू शकता.
बेल्ट सैंडल
बेल्ट सँडल उन्हाळ्यासाठी एक स्टायलिश आणि आरामदायी पर्याय आहेत. हे तुमच्या पायांना चांगला आधार देतात आणि तुम्हाला एक स्टायलिश लूक मिळेल.
सँडल
उन्हाळ्यात सँडल घालणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे हवेशीर आहेत आणि तुमच्या पायांना श्वास घेण्यास परवानगी देतात. तुम्ही फ्लॅट सँडल, हील्स किंवा वेजेसमधून निवडू शकता.
उन्हाळ्यासाठी सॅन्डल निवडताना खालील गोष्टी लक्षात घ्या
- हलक्या आणि जास्त घट्ट नसलेल्या सॅन्डलची निवड करा.
- प्लास्टिक किंवा बंदिस्त सॅन्डल टाळा
- योग्य माप निवडा
- प्रसंगानुसार सॅन्डलची निवड करा
- धुण्यास सोपे आणि टिकाऊ मटेरियल निवडावे.
हेही वाचा : Fashion Tips : या ड्रेसवर स्टोन नेकलेस करा ट्राय
Edited By : Prachi Manjrekar