Thursday, December 12, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीBest time for dinner : रात्री लवकर का जेवावे?

Best time for dinner : रात्री लवकर का जेवावे?

Subscribe

आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपल्या जेवणाच्या वेळाही यासाठी योग्य असणे आवश्यक असते. अनेकजण जेवणाच्या वेळा पाळत नाही. विशेष करून, रात्रीच्या वेळा पाळल्या जात नाही. पण, अशाने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन शरीराच्या व्याधी सुरू होतात. डॉक्टरांच्या मते, निरोगी शरीरासाठी रात्री लवकर जेवणे महत्त्वाचे असते. पण, मग रात्री जेवण्याची योग्य वेळ कोणती आणि त्याचे फायदे कोणते, हे पाहूयात.

रात्री जेवणाची योग्य वेळ कोणती –

तज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण 7 वाजता होणे आवश्यक आहे. हल्ली धावपळीच्या आयुष्यात 7 वाजता जेवण करणे सर्वानाच शक्य होत नाही. त्यामुळे किमान 8 वाजेपर्यत तरी रात्रीचे जेवण तुम्ही करायला हवे. रात्री 9 नंतरचे जेवण आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.

- Advertisement -

वेळेत जेवण्याचे फायदे –

  • लवकर जेवल्याने पचन व्यवस्थित होते. तसेच पचनसंस्थेला रात्रभर विश्रांतीसाठी वेळ मिळतो. मात्र, जेव्हा तुम्ही रात्री उशिरा जेवता तेव्हा अन्न लवकर पचत नाही. अन्न व्यवस्थित न पचल्याने पोटाच्या तक्रारी सुरु होतात. जसे की, अॅसिडीटी, गॅस.
  • जेव्हा तुम्ही रात्री वेळेत जेवता तेव्हा पचनसंस्थेला अन्न पचवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते.
  • रात्री वेळेत जेवल्याने वजन कंट्रोलमध्ये राहते. रात्री लवकर जेवल्याने झोपेच्या वेळी छातीत किंवा पोटात होणाऱ्या जळजळीपासून सुद्धा आराम मिळेल.
  • जेवल्यानंतर लगेच झोपू नये. असे केल्याने अन्न नीट पचत नाही, ज्यामुळे व्यक्तीला अनेक आजार होतात. पण, जेव्हा तुम्ही 7 वाजता जेवण करता तेव्हा अन्न पचायला वेळ मिळतो आणि तुमचा मुडही चांगला राहतो. परिणामी, हृदयाचे आरोग्य सुरळीत राहते. कारण योग्य प्रकारे अन्न पचल्यानंतर हृदयाचे ठोके व्यवस्थित कार्य करतात.
  • रात्री लवकर जेवल्याने अन्न पचण्यास वेळ मिळतो आणि सर्व पोषक तत्वे योग्य प्रकारे शोषली जातात. यासह वेळेत जेवल्याने तुमचे शरीर इन्सुलिनचा अधिक चांगला वापर शकते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही आणि हृदयविकार, डायबिटीसचा धोका उद्भवत नाही.

 

 

- Advertisement -

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini