Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल पावसाळ्यात कपड्यांचा 'कुबट' वास.. असा घालवा

पावसाळ्यात कपड्यांचा ‘कुबट’ वास.. असा घालवा

Related Story

- Advertisement -

ओले कपडे लवकर न वाळल्यामुळे काहीवेळाने त्यांना कुबट वास यायला लागतो. पावसाळ्याच्या दिवसांत तर ही समस्या हमखास डोकं वर काढते. पावसाने आधीच भिजलेले कपडे कडक ऊन नसल्याने पुरेसे वाळत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यातून कुबट वास येतो. तुम्हीही या त्रासाने हैराण आहात का? मग जाणून घ्या, कपड्यांचा वास घालवण्यासाठीचे सोपे घरगुती उपाय. हे उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरु शकतील.

अनेकांना बाहेरुन आल्यानंतर अंगावरचे कपडे उतरवून, ते लगेच वॉशींग मशीन किंवा मोरीत टाकण्याची सवय असते. पावसाळ्यात तुम्ही आधीच भिजून आल्यामुळे तुमचे कपडे ओले असतात. अशावेळी ते धुवायला टाकण्यापूर्वी पंख्याखाली वाळवा. जेणेकरुन दुसऱ्या दिवशी ते धुवेपर्यंत त्यांचा वास येणार नाही.

- Advertisement -

तुम्ही कपडे धुताना डिटर्जंट पावडर वापरता का? तर मग या दिवसांत डिचर्जंट पावडरमध्ये थोडासा बेकिंग सोडा घाला. यामुळे कपड्यांचा वास तर जाईलच पण त्याशिवय कपडे अधिक स्वच्छ आणि निर्जंतुक व्हायला मदत होईल.

- Advertisement -


पावसाच्या दिवसांत सूर्यप्रकाश कितीवेळ असेल याचा काहीच भरवसा देता येत नाही. त्यामुळे ऊन येण्याची वाट पाहत बसू नका. भिजलेले कपडे सुकवण्यासाठी ते खोलीमध्ये पंख्याखाली वाळत घाला. याशिवाय शक्य असल्यास घराची दारं-खिडक्या उघड्या ठेवा. जेणेकरुन घरात हवा खेळती राहून कपडे लवकर सुकतील.

- Advertisement -