ऍल्युमिनिअम फॉइलचा वापर स्वयंपाकघरात केला जातो. पदार्थ पॅक करण्यासाठी ऍल्युमिनिअम फॉइल वापरतात. स्वयंपाक करताना आर्द्रता गमावण्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि मांसाहारी पदार्थ पॅक करण्यासाठी ऍल्युमिनिअम फॉइल वापरणे फायद्याचे ठरेल. याव्यतिरीक्त भाज्या ग्रिल करण्यसाठी फायदेशीर असतो. एकदा वापरलेला ऍल्युमिनिअम फॉइल आपण पुन्हा वापरत नाही. पण, तुम्हाला हे आहे का? आपण एकदा वापरलेला ऍल्युमिनिअम फॉइल पेपर किचनमधील अनेक कामे चुटकीसरशी सोपी करू शकतो.
- पोळ्यांसाठी वापरलेला ऍल्युमिनिअम फॉइल पेपर तुम्हाला कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी वापरता येईल. कोथिंबीर ऍल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवल्याने कोथिंबीर लवकर खराब होत नाही.
- तुम्हाला वापरलेल्या ऍल्युमिनिअम फॉइलचा वापर करून चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी करता येईल. यासाठी एका भांड्यात जुना ऍल्युमिनिअम फॉइल पेपर घ्या आण सर्वत्र पसरवून घ्या.. यानंतर यात बेकिंग सोडा, मीठ सुद्दा घाला. आता यात चांदिचे दागिने ठेवा. यानंतर मिश्रणात 2 ते 3 कप गरम पाणी टाका. 10 मिनिटे चांदीचे दागिने तसेच असूद्या. या ट्रिक्सने चांदिचे दागिने स्वच्छ होतील.
- कापलेली फळे फ्रीडमध्ये आपण उघडी ठेवतो. पण, अशाने फळांचे काप काळे पडतात. अशावेळी तुम्हाला ऍल्युमिनिअम फॉइल पेपरचा वापर करता येईल. ऍल्युमिनिअम फॉइलमध्ये फळांचे काप पॅक करून ठेवल्याने काळे पडत नाही.
- ऍल्युमिनिअम फॉइल तुम्हाला स्क्रबर म्हणून वापरता येईल. डिश वॉशर लिक्वीडचा वापर करून तुम्हाला भांडी स्वच्छ करता येईल.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वयंपाक करताना पदार्थाचे डाग शेगडीवर लागतात. हे डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला ऍल्युमिनिअम फॉइलचा वापर करता येईल. ऍल्युमिनिअम फॉइलचा वापर स्क्रबर म्हणून करता येऊ शकतो.
- ऍल्युमिनिअम फॉइलच्या साहाय्याने ओव्हनचे दरवाजे स्वच्छ करता येतील. ऍल्युमिनिअम फॉइलने ओव्हन स्वच्छ केल्याने ओव्हनच्या दरवाज्यावर कोणत्याही प्रकारचे व्रण उठत नाही.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde