गुलाबी थंडी सुरु झाली असून अनेकजणांचे थंडीत फिरण्यासाठी प्लॅन सुरू झाले असतील. नोव्हेंबर-डिसेंबरचा महिना म्हणजे कुठेतरी फिरण्याचा बेत नक्कीच होतो. तुमचा सुद्धा थंडीत कुठेतरी पिकनिकचा प्लॅन असेल आणि ठिकाण निश्चित होत नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला थंडीत फॅमिलीसोबत किंवा फ्रेन्डससोबत फिरण्यासाठी बजेटमधील काही ठिकाणे सांगणार आहोत. येथे तुम्हाला गुलाबी थंडीसह निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येईल.
गोवा –
थंडीत फिरण्यासाठी तुम्ही गोव्याची निवड करू शकता. या दिवसात येथे तापमान 21 ते 31 अंशापर्यत असते. येथे तुम्ही फॅमिलीसोबत किंवा फ्रेन्डससोबत गुलाबी थंडीसह समुद्रकिनारी आनंद घेता येईल.
गोकर्ण –
डिसेंबरमध्ये गोकर्ण येथे फिरायला जाणे हा ऑप्शन सुद्धा परफेक्ट राहील. भव्य आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी गोकर्ण ओळखले जाते. येथे तुम्हाला बघण्यासाठी भगवान शंकराची अनेक मंदिरे दिसतील.
राजस्थान –
पिंक सिटी असे राजस्थानला म्हटले जाते. थंडीच्या दिवसात तुम्ही येथे जाऊ शकता. येथे तुम्हाला हवा महल, नाहरगड किल्ला, आमेर किल्ला अशी प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील.
औली –
उत्तराखंड येथील औली हे ठिकाण थंडीच्या दिवसात फिरण्यासाठी उत्तम राहील. येथे तुम्हाला पाइन वृक्ष, सफरचंदाच्या बागा दिसतील. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2800 मीटर उंचीवर असून नंदा देवी, मान पर्वत आणि कामत पर्वतरांगा आहेत.
केरळ –
देशाच्या दक्षिणेला असणारे एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणजे केरळ. केरळ ला जाण्यासाठी तुम्हाला रेल्वे किंवा विमानाने जावे लागेल. येथील उंच पर्वत रांगा, समुद्र किनारे आणि बॅकवॉटर्ससारखे अद्वितीय गोष्टी तुम्हाला पाहता येतील.
काश्मीर –
काश्मीर येथील गुलमर्ग हे पाहण्यासारखे ठिकाण आहे. येथे तुम्हाला हिमवृष्टीचा आनंद घेता येईल. काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग असे म्हटले जाते. त्यामुळे थंडीत फिरण्यासाठी काश्मीरचा पर्याय उत्तम राहील.
पुदुच्चेरी –
देशातील पारंपारिक संस्कृती पाहायची असेल तर पुदुच्चेरीचा ऑप्शन उत्तम राही. येथे देशातील पारंपारिक संस्कृतीसोबत फ्रेंच वास्तुकला पाहता येतील. डिसेंबर महिन्यात बजेटमध्ये फिरायचे असेल तर हे ठिकाण योग्य राहील.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde