अनेकांना अपचन, ऍसिडिटी, गॅसचा त्रास वारंवार जाणवतो. यामागे तळलेले, मसालेदार पदार्थ, जंक फूड, बदलती जीवनशैली अशी कारणे कारणीभूत ठरत आहेत. या कारणांसह पोटाच्या तक्रारी सुरू होण्याचे आणखी एक कारण म्हणजे जेवल्यानंतर लगेचच झोपणे किंवा एका जागी स्वस्थ बसून राहणे. आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या या सवयीमुळे पदार्थाचे व्यवस्थित पचन होत नाही. अशावेळी तुम्ही 5 ते 10 मिनिटांसाठी योगासनातील एक आसन करू शकता.
कोणत्या आसनात बसाल?
जेवल्यानंतर वज्रासनात बसावे. या आसनात दररोज बसल्याने पदार्थाचे व्यवस्थित पचन होते.
वज्रासन कसे कराल?
- वज्रासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी गुडघ्यावर बसावे.
- बसल्यानंतर नितंब पायांच्या बोटांवर राहतील याची काळजी घ्यावी.
- वज्रासनात बसताना पाठीचा कणा ताठ ठेवावा.
- यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ठेवावेत.
- दिर्घ श्वास घ्यावा.
- व्रजासनात बसण्याचा सराव कमीत कमी 5 ते 10 मिनिटे करावा.
वज्रासन बसण्याचे फायदे –
पचनसंस्था –
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी दररोज वज्रासनात बसावे. जेवल्यानंतर वज्रासनात बसल्याने बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो आणि आतड्या निरोगी राहतात.
मणक्याचे आरोग्य सुधारते –
वज्रासनात बसल्याने मणक्याचे आरोग्य सुधारते. तुम्हाला नियमित पाठदुखीचा त्रास असेल तर दररोज या आसनात बसावे.
पायदुखी –
पायदुखीचा त्रास वारंवार जाणवत असेल तर व्रजासनात बसणे फायद्याचे ठरेल. व्रजासानाच्या नियमित सरावाने पायातील स्नायुंना आराम मिळतो. स्नायुंना आराम मिळाल्याने पायदुखी जाणवत नाही.
कंबरदुखी –
बैठ्या जीवनशैलीमुळे कंबरेचे दुखणे हे बऱ्याचजणांच्या रोजच्या सवयीतील झाले आहे. अशावेळी कंबरदुखी कमी करण्यासाठी तुम्ही दररोज काही वेळ वज्रासनात बसण्याचा सराव करावा, नक्कीच आराम मिळेल.
हेही पाहा –