घरदिवाळी 2022bhaubeej 2022 : जाणून घ्या भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आणि विधी

bhaubeej 2022 : जाणून घ्या भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आणि विधी

Subscribe

दिवाळी सणानंतर भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण भाऊ- बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतिक मानले जाते. यावर्षी हा सण 26 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा केला जाईल. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या सूर्यग्रहणामुळे 26 ऑक्टोबर रोजी हा सण साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार, भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाची ओवाळणी करत त्याच्या सुख- समृद्धीसाठी कामना करते. मात्र यंदा भाऊबीजचे शुभ मुहूर्त आणि विधी पद्धती नेमक्या काय आहेत जाणून घेऊ…

भाऊबीजचे शुभ मुहूर्त

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी 26 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:42 वाजता सुरू होत असून दुसऱ्या दिवशी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:45 वाजता समाप्त होईल. भाईबीज सणाला यम द्वितीय असे देखील म्हटले जाते. ओळणीचा मुहूर्त दुपारी 1:12 ते 3:27 पर्यंत असेल.

- Advertisement -

भाईबीजचे पूजा विधी

भाऊबीजच्या दिवशी भाऊ-बहिणी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून घरातील मंदिरात दिवा लावा. या दिवशी भगवान विष्णू आणि गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. भाऊबीजच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाला घरी बोलावून त्याची ओवाळणी करत स्वतःच्या हाताने तयार केलेले जेवण द्यावे. शुभ मुहूर्तावर भावाची ओवाळणी केल्याने जीवनात यश मिळते आणि येणारे सर्व अडथळे दूर होतात. भावाला कुंकू लावून ओवाळणी करत त्याच्या हातात संरक्षक धागा बांधावा. मग गोड खायला द्या. या दिवशी भावा- बहिणींनी एकमेकांना काही भेटवस्तू दिल्या पाहिजेत.

भाईबीज 2022 पूजा मंत्र (Bhai Dooj Puja Mantra)

चंदनस्य महातपुण्यं पवित्रं पाप नाशनम् ।

- Advertisement -

आपदं हरति नित्यं लक्ष्मी तिष्ठी सदा ।

कांति लक्ष्मी धृति सौख्यं सौभाग्यमातुलुं बलम् ।

ददतु चन्दनम् नित्यं सत्तम धर्यम्यः ।


अस्वीकरण- या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. आमचा उद्देश फक्त माहिती वितरीत करणे हा आहे, युजर्सनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. याव्यतिरिक्त युजर्स स्वत: त्याच्या कोणत्याही वापरासाठी जबाबदार असेल.


दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान जया बच्चन पत्रकारांवर संतापल्या, पाठलाग करत म्हणाल्या…


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -