Friday, April 19, 2024
घरमानिनीBeautyटिकली लावल्यानंतर खाज येत असेल तर 'हे' उपाय करा

टिकली लावल्यानंतर खाज येत असेल तर ‘हे’ उपाय करा

Subscribe

टिकली ही भारतीय महिलांच्या श्रृंगारामधील महत्वाचा हिस्सा आहे. विवाहित महिलांनी जरी सिंम्पल मेकअप केला तरीही त्या टिकली जरुर लावतात. टिकलीने प्रत्येक महिलेचे सौंदर्य अधिक खुलले जाते. परंतु दिवसभर टिकली लावल्यानंतर काही महिलांना कपाळाच्या येथे खाज येते किंवा स्किन एलर्जीची समस्या होते. तुम्ही सुद्धा अशा समस्येचा सामना करत असाल तर पुढील सोपे उपाय तुम्ही करु शकता.

खरंतर टिकली कपाळावर चिकटून रहावी म्हणून त्याच्यामागील बाजूस पॅरा टर्शियरी ब्युटिल फिनॉल केमिकल लावले जाते. हेच केमिकल एलर्जीचे कारण ठरते. ज्या महिलांची त्वचा सेंसिटिव्ह असते त्यांनी एलर्जी होण्याची शक्यता अधिक असते.

- Advertisement -

-एलोवेरा जेल

aloe vera
कोरफड

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कपाळाला एलोवेरा जेल लावावे, जेणेकरुन ही समस्या दूर होईल. एलोवेरात अँन्टी बॅक्टेरियल आणि अँन्टी सेप्टिक गुण असतात. काही दिवस दररोज ते तुम्ही एलर्जी झालेल्या येथे लावा आणि हलके मसाज करा.

- Advertisement -

-मॉइश्चराइजर


कपाळाला ज्या ठिकाणी एलर्जी झाली आहे तेथे तुम्ही मॉइश्चराइजर लावू शकता. दिवसातून तीन ते चार वेळा कपाळाला मॉइश्चराइजर लावल्याने त्या ठिकाणी खाज येण्याची समस्या दूर होईल.

-नारळाचे तेल


टिकली लावता तेथे तुम्ही नाराळाच्या तेलाने मसाज करा. नारळाचे तेल त्वचेसाठी उत्तम मानले जाते. यामुळे तुमची स्किन कोमल राहते आणि एलर्जी पासून ही तुम्ही दूर रहाल.

-तिळाचे तेल


टिकली लावल्याने एलर्जी झाल्यास त्या ठिकाणी तिळाचे तेल लावा. तिळाच्या तेलाचे 2-3 थेंब बोटांवर घेऊन हलके मसाज करा. शक्य असेल तर काही दिवस टिकली ही लावू नका.


हेही वाचा- skin care : डोळ्यांच्या डार्क सर्कला करा बाय बाय, ‘या’ क्रीमचा करा वापर

- Advertisment -

Manini