Sunday, February 25, 2024
घरमानिनीBeautyप्रत्येक महिलेच्या वॅनिटी बॉक्समध्ये असाव्यात टिकल्यांच्या 'या' डिझाइन्स

प्रत्येक महिलेच्या वॅनिटी बॉक्समध्ये असाव्यात टिकल्यांच्या ‘या’ डिझाइन्स

Subscribe

ट्रेडिशनल लूकसोबत महिलांना टिकली लावणे आवडते. भारतीय संस्कृतीमध्ये टिकली लावणे शुभ मानले जाते. खासकरुन गोल आकाराची लाल टिकली. आजच्या मॉर्डन काळात गोल टिकली ऐवजी तुम्हाला अन्य काही डिझाइन्सच्या टिकल्या मार्केटमध्ये मिळतात. जेणेकरुन तुम्ही खास कार्यक्रमानुसार टिकलीच्या पुढील काही डिझाइन्स निवडू शकता.

लाल टिकली

- Advertisement -


ही पारंपारिक टिकलीची डिझाइन आहे. लाल रंगाची टिकली जवळजवळ प्रत्येक ट्रेडिशनल आउटफिटवर उत्तम दिसते. महिलांना अशी टिकली लावणे फार आवडते.

ओवरसाइज टिकली

- Advertisement -


आजकाल ओवरसाइज टिकली सुद्धा बहुतांश महिला लावतात. हैवी ट्रेडिशनल आउटफिटवर तुम्ही अशा प्रकारची टिकली लावू शकता.

ब्लॅक टिकली


तुम्ही काळ्या रंगाची लहान गोलाकार टिकली लावू शकता. ही टिकली सुद्धा सर्व आउटफिटवर उत्तम दिसते.

फ्लोरल स्टाइल टिकली


सणाच्या दिवशी तुम्ही फ्लोरल टिकली लावू शकता. यामध्ये सिंपल आणि स्टोन असलेली डिझाइन निवडू शकता.

चंद्रकोर


चंद्रकोर टिकली सुद्धा अगदी ट्रेडिशनल लूकवर सुंदर दिसते. यामध्ये तुम्ही प्लेन किंवा त्यावर स्टोन लावलेली डिझाइन निवडू शकता.


हेही वाचा- ऑफिससाठी या लिपस्टिक शेड आहेत बेस्ट

- Advertisment -

Manini